ऑपरेशनपूर्वी कवटीच्या भागावर केस मुंडले जातील. नसेत सुई द्वारा नळ्या लावल्या जातील आणि शस्त्रक्रियापूर्व औषधे दिली जातील.
सामान्य भूल (जनरल एनेस्थेशिया) दिली जाते. काही प्रकरणांमध्ये, जागृत शस्त्रक्रिया केली जाते, अधिक माहिती या लेखाच्या शेवटी दिली आहे. जागृत शस्त्रक्रिया मेंदूचे असे भाग वाचवण्यास मदत करते की जे भाषा आणि हालचाल नियंत्रित करतात. रूग्ण जरी जागा असला तरी जागृत शस्त्रक्रियेत रुग्णाला वेदना होत नाहीत.
सर्जन कवटीच्या एका लहान छीद्रातून शस्त्रक्रिया करतात. शस्त्रक्रियेनंतर सर्जन कवटी मध्ये झालेले छीद्र कवटीच्या काढलेल्या हाडांनी बंद करतात. योग्य औषधांनी वेदना कमी करण्यात येतात. संसर्ग टाळण्यासाठी प्रतिजैविके औषधे (एन्टीबायोटीक्स) दिली जातात. एपिलेप्सी शस्त्रक्रियेसाठी एकूण रुग्णालयात मुक्काम तीन ते सात दिवसांचा असु शकतो.
ऑपरेशन नंतर कामावर किंवा शाळेत परत येण्यासाठी एक ते तीन महिने लागू शकतात. सामान्य क्रियाकलाप हळूहळू सुरू करणे आवश्यक आहे.