स्पाइनल फ्यूजन शस्त्रक्रिया विचारात घेण्याची अनेक संभाव्य कारणे आहेत. यामध्ये फ्रॅक्चर झालेल्या कशेरुकाचे उपचार, विकृती सुधारणे, हालचालीदरम्यान होणार्या वेदना दूर करणे, अस्थिरतेवर उपचार करणे आणि मणक्यामधील डिस्क हर्निएशनवर उपचार करणे अशी कारणे असतात.
सर्व पाठीच्या फ्रॅक्चरला शस्त्रक्रियेची आवश्यकता नसते. काही फ्रॅक्चर मध्ये, विशेषत: पाठीचा कणा किंवा मज्जातंतूच्या दुखापतीशी संबंधित केसमध्ये उपचारांचा भाग म्हणून फ्यूजन शस्त्रक्रिया आवश्यक असते.
उपचार लागतो अशी दुसरी स्थिती म्हणजे पाठीच्या कण्याची अस्थिरता, म्हणजे दोन किंवा अधिक कशेरुकांमधील असामान्य किंवा जास्त हालचाल होणे. सामान्यतः असे मानले जाते की अशी मणक्यांमधील अस्थिरता पाठीच्या किंवा मानेच्या वेदनांचे स्त्रोत असू शकते किंवा त्यामुळे मज्जातंतु बिघडू शकतात किंवा मज्जातंतूंना नुकसान होऊ शकते.
दोन मणक्यांमधील चकती चे (डिस्क चे) जेव्हा हर्निएशन तेव्हा त्या रूग्णांना सहसा फ्यूजन शस्त्रक्रियेची आवश्यकता असते. या तंत्रात मानेच्या पुढच्या भागात चीर टाकून डिस्क काढून त्या जागी हाडाचा छोटा तुकडा बसवला जातो.