पार्किन्सन हा एक सतत वाढत जाणारा (प्रगतीशील) मज्जासंस्थेचा आजार आहे. यात हालचाल, अभिव्यक्ती, वेग इत्यादींवर परिणाम होतो. लक्षणे हळूहळू सुरू होतात आणि हळूहळू वाढतात.
पार्किन्सन रोग बरा होऊ शकत नसला तरी औषधे लक्षणे सुधारण्यास मदत करतात. क्वचितच, शस्त्रक्रिया करून लक्षणे कमी होऊ शकतात.
पार्किन्सन रोगाचे नाव इंग्लिश वैद्य जेम्स पार्किन्सन यांच्या नावावर ठेवले गेले आहे, ज्यांनी 1817 मध्ये शेकिंग पाल्सी किंवा पॅरालिसिस ऍजिटन्स नावाच्या आजाराचे सर्वसमावेशक वर्णन प्रकाशित केले होते.
थरथरणे किंवा अंग कापणे. हात किंवा बोटे झोपतांना देखील सतत हालचार सुरू असते. गाढ झोप लागली की सतत होणारी हातांची किंवी शरीराची हालचाल थांबते. अंगठा आणि तर्जनी पुढे–मागे घासून शेवया वळल्या सारखी सतत हालचाल होऊ शकते, याला पील रोलिंग मुवमेन्ट म्हणतात.
हालचाली मंदावल्या असल्याने साधी कामे देखील अवघड होतात. चालताना पावले जवळ जवळ पडतात. खुर्चीवर बसले असतांना त्यातून उठणे कठीण होते. चालतांना रुग्णाचे पाय जमिनीवर फरफटले जाऊ शकतात.
स्नायू कडक राहतात व ते वेदनादायक होऊ शकते. हालचालीची गतीची हळु होते.
मुद्रा आणि संतुलन बिघडलेले राहते. चालतांना पवित्रा वाकलेला असू शकतो, संतुलन सांभाळणे अवघड होते.
आपोआप डोळे उघडबंद होणे, स्मीत हास्य करणे किंवा चालतांना आपोआप हात हलवणे यांसारख्या स्वयंचलित हालचाली कमी होतात.
रुग्ण पटकन बोलु शकत नाहीत, बोलतांना हळूवारपणे, नीरसपणे व पटापटा बोलतात, त्यांचे शब्द जीभ जडावल्यासारखे येतात. त्यांना लिहिणे कठीण होऊन बसते.
तुमचे वय ६० पेक्षा जास्त असल्यास, तुम्हाला वरीलपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास, डॉक्टरांना जरूर भेटा.
मेंदूतील काही न्यूरॉन्स [मज्जातंतू पेशी] तुटतात किंवा मरतात. मेंदूमध्ये डोपामाइन नावाचा रासायनिक संदेशवाहक निर्माण करणाऱ्या न्यूरॉन्सच्या नुकसानीमुळे अनेक लक्षणे दिसून येतात. जेव्हा डोपामाइनची पातळी कमी होते, तेव्हा ते असामान्य मेंदूच्या क्रियाकलापांना कारणीभूत ठरते, ज्यामुळे हालचाली बिघडतात आणि पार्किन्सन रोगाची इतर लक्षणे दिसतात.
पार्किन्सन रोगाचे कारण अज्ञात आहे, परंतु अनेक घटक भूमिका बजावतात.
अनेक कॉम्प्लिकेशन्स होतात, पण त्यांचा उपचार करता येतो.
पार्किन्सन्सचे कारण अज्ञात असल्याने, हा रोग टाळण्याचे मार्ग देखील एक गूढच राहतात.
नियमित एरोबिक व्यायाम पार्किन्सन रोगाचा धोका कमी करू शकतो.
जे लोक कॉफी, चहा, ग्रीन टी आणि कोलामध्ये कॅफिनचे सेवन करतात त्यांना पार्किन्सन रोगाचा धोका कमी असतो.
पार्किन्सन रोगाचे निदान करण्यासाठी कोणतीही विशिष्ट चाचणी अस्तित्वात नाही. मेंदूचे विशेषज्ञ [न्यूरोलॉजिस्ट, न्यूरोसर्जन] रुग्णाच्या वैद्यकीय इतिहासावर, चिन्हे आणि लक्षणांचे पुनरावलोकन आणि न्यूरोलॉजिकल आणि शारीरिक तपासणीच्या आधारावर पार्किन्सन रोगाचे निदान करतात.
पार्किन्सन्स सारखीच लक्षणे असलेले इतर रोग नाहीत हे पहाण्यासाठी पॅथॉलॉजी प्रयोगशाळेच्या व इमेजींग चाचण्या केल्या जातात.
विशेष स्कॅन जसे की SPECT किंवा डोपामाइन ट्रान्सपोर्टर स्कॅन [DaTscan] चाचण्या मदत करू शकतात. एमआरआय, मेंदूचा अल्ट्रासाऊंड आणि पीईटी स्कॅन सारख्या इतर स्कॅनचा वापर इतर विकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो. पण पार्किन्सन रोगाचे निदान करण्यासाठी इमेजिंग चाचण्या विशेषतः उपयुक्त नाहीत.
चाचणी व्यतिरिक्त, पार्किन्सन रोगाची औषधे पुरेशा डोसमध्ये दिली जातात आणि जर रुग्णाला फायदा झाला तर पार्किन्सन्सच्या निदानाची पुष्टी केली जाऊ शकते.
कधीकधी पार्किन्सन रोगाचे निदान होण्यास वेळ लागतो. वेळोवेळी रुग्णाची स्थिती आणि लक्षणे यांचे मूल्यांकन करण्यासाठी आणि पार्किन्सन रोगाचे निदान करण्यासाठी डॉक्टर न्यूरोलॉजिस्टसह नियमित फॉलो–अप तपासणीचा सल्ला देऊ शकतात.
पार्किन्सन रोग बरा होऊ शकत नाही, परंतु औषधे रोग्याच्या लक्षणांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकतात. अनेकदा काही अधिक प्रगत केसेस मध्ये शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.
जीवनशैलीतील बदल, विशेषतः एरोबिक व्यायाम करणे उपयोगी ठरते. फिझियोथेरपी की जी संतुलन आणि स्ट्रेचिंगवर लक्ष केंद्रित करते, काही केसमध्ये उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण ठरते. स्पीच आणि लँग्वेज थेरपिस्ट बोलण्याच्या समस्या सुधारण्यास मदत करू शकतात.
चालणे, हालचाल आणि थरथरणाऱ्या समस्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी औषधे मदत करू शकतात. ही औषधे शरीरातील डोपामाइनचे प्रमाण वाढवतात किंवा ती जोपामाईनची पर्यायी औषधे आहेत.
पार्किन्सन रोग असलेल्या लोकांच्या मेंदूत डोपामाइनचे प्रमाण कमी असते. तथापि, डोपामाइन औषध म्हणून दिले जाऊ शकत नाही, कारण ते थेट मेंदूमध्ये प्रवेश करू शकत नाही. त्यामुळे मेंदूमध्ये प्रवेश करून डोपामाइन वाढवणारी किंवा डोपामाइनची पर्यायी औषधे दिली जातात.
पार्किन्सन रोगाचा उपचार सुरू केल्यानंतर लक्षणांमध्ये सुधारणा होते. तथापि, कालांतराने, औषधांचे फायदे हळूहळू कमी होतात किंवा कमी सुसंगत होतात. तरीही सहसा लक्षणे बऱ्यापैकी नियंत्रित होतात.
कार्बिडोपा–लेवोडोपा. लेव्होडोपा हे पार्किन्सन रोगावरील सर्वात प्रभावी औषध आहे. हे एक नैसर्गिक रसायन आहे जे मेंदूमध्ये जाते आणि त्याचे डोपामाइनमध्ये रूपांतर होते.
लेवोडोपा हे कार्बिडोपा (लोडोसिन) सह एकत्रित केले जाते, जे लेव्होडोपाला मेंदूच्या बाहेर डोपामाइनमध्ये लवकर रुपांतरित होण्यापासून संरक्षण करते. या मुळे मळमळी सारखे दुष्परिणाम कमी होतात.
साइड इफेक्ट्समध्ये मळमळ किंवा डोके हलके वाटणे (ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन) यांचा समावेश असू शकतो.
पार्किंसन रोग जसजसा वाढत जातो, तसतसे बर्याच वर्षांनी लेव्होडोपाचे फायदे कमी होऊ शकतात. कधी फायदे वाढतात, तर कधी ते कमी होतात.
लेव्होडोपाचे जास्त डोस घेतल्यानंतर अनैच्छिक हालचाली (डिस्कायनेसिया) होऊ शकतात. त्यामुळे हे दुष्परिणाम नियंत्रित करण्यासाठी डॉक्टर औषधांचा डोस कमी करतात.
इनहेल्ड कार्बिडोपा–लेवोडोपा (नाकातून श्वासाबरोबर घेतलेले औषध) देखील वापरले जाते. जेव्हा तोंडावाटे घेतलेले औषधे दिवसभरात अचानक काम करणे थांबवतात तेव्हा उद्भवणारी लक्षणे कमी करण्यासाठी श्वासाबरोबर घेतलेले औषध उपयुक्त ठरू शकते.
कार्बिडोपा–लेवोडोपा मिश्रण कार्बिडोपा आणि लेवोडोपापासून बनलेले आहे. तथापि, हे फीडिंग ट्यूबद्वारे दिले जाते. हे औषध थेट लहान आतड्यात जेलच्या स्वरूपात वितरीत केले जाते. हे अति प्रगत पार्किन्सन्स असलेल्या रूग्णांसाठी आहे जे अजूनही कार्बिडोपा–लेवोडोपाला प्रतिसाद देतात, परंतु त्यांच्या प्रतिसादात बरेच चढ–उतार आहेत. हे मिश्रण हळूहळू आणि सतत ओतले जात असल्याने, या दोन औषधांची रक्त पातळी बऱ्यापैकी स्थिर असते.
औषधे वितरीत करणार्या नळ्या एका छोट्या शस्त्रक्रियेद्वारे शरीरात ठेवल्या जातात. त्यातून सतत औषधे दिली जातात. नलिका लावण्याच्या जोखमीं म्हणजे नलिका बाहेर निघू शकते किंवा त्या जागी संक्रमण होऊ शकते.
डोपामाइनऐवजी, डोपामाइन सारखीच औषधे वापरली जातात, ज्याला डोपामाइन ऍगोनिस्ट म्हणतात. लेव्होडोपा प्रमाणे डोपामाइन ऍगोनिस्टचे डोपामाइनमध्ये रूपांतर होत नाही. त्याऐवजी, ते मानवी मेंदूमध्ये डोपामाइन प्रभावांची नक्कल करतात. ते लक्षणांवर उपचार करण्यासाठी लेव्होडोपाइतके प्रभावी नाहीत. पण ही औषधे जास्त काळ टिकतात आणि लेव्होडोपामुळे काहीवेळा होणारे “चढ–उतार” कमी करायला वापरले जाऊ शकतो.
डोपामाइन ऍगोनिस्टमध्ये प्रॅमिपेक्सोल, रोपिनिरोल आणि रोटीगोटीन पॅच यांचा समावेश होतो. एपोमॉर्फीन हे एक कमी वेळ काम करणारे व इंजेक्शन द्वारे देण्याचे डोपामाइन ऍगोनिस्ट आहे. हे पटकन परिणाम करते.
डोपामाइन ऍगोनिस्ट्सचे काही दुष्परिणाम कार्बिडोपा–लेवोडोपाच्या दुष्परिणामांसारखेच आहेत. त्यामध्ये मतिभ्रम, निद्रानाश आणि अतिलैंगिकता, जुगार खेळणे आणि अति खाणे यासारख्या वर्तनांचा समावेश असू शकतो. त्यामुळे ही औषधे घेण्यार्या रूग्णांवर लक्ष ठेवायला लागते.
एमएओ बी इनहिबिटर जसे की सेलेजिलिन, रासागिलिन आणि सॅफिनामाइड यांचा समावेश होतो. ते ब्रेन एन्झाइम मोनोमाइन ऑक्सिडेस बी (एमएओ बी) प्रतिबंधित करून मेंदूच्या डोपामाइनचे विघटन रोखण्यास मदत करतात. हे एन्झाइम मेंदूच्या डोपामाइन कमी करते. लेव्होडोपा सोबत जर सेलेजिलीन दिले तर लेव्होडोपाचा परिणाम लगेच कमी होत नाही.
MAO B इनहिबिटरच्या दुष्परिणामांमध्ये डोकेदुखी, मळमळ किंवा निद्रानाश यांचा समावेश असू शकतो. ही औषधे कार्बिडोपा–लेवोडोपा बरोबर दिल्यास भ्रम होण्याचा धोका वाढवतात.
Catechol O-methyltransferase (COMT) इनहिबिटर. उदाहरणे Entacapone आणि Opicapone आहेत. ते लेवोडोपा थेरपीचा प्रभाव सौम्यपणे वाढवतात. साइड इफेक्ट्स म्हणजे अनैच्छिक हालचाली (डिस्कायनेसिया), अतिसार, मळमळ किंवा उलट्या.
पार्किन्सन रोगाशी संबंधित थरथर नियंत्रित करण्यासाठी अँटीकोलिनर्जिक्स औषधे अनेक वर्षांपासून वापरली जात होती. बेंझट्रोपिन आणि ट्रायहेक्सिफेनिडिल ही उदाहरणे आहेत.
Amantadine चा उपयोग सौम्य, प्रारंभिक अवस्थेतील पार्किन्सन रोगाच्या लक्षणांपासून अल्पकालीन आरामासाठी केला जातो. अनैच्छिक हालचाली (डिस्कायनेसिया) नियंत्रित करण्यासाठी पार्किन्सन रोगाच्या नंतरच्या टप्प्यात कार्बिडोपा–लेवोडोपा थेरपी देखील दिली जाऊ शकते.
या लेखाच्या पुढील भागात पार्किन्सन रोगावरील शस्त्रक्रिया आणि रुग्णाच्या कुटुंबातील सदस्य किंवा मित्र यांनी सर्वांनी मिळून पार्किन्सन रोगाचा कसा सामना करावा याबद्दल माहिती देण्यात येईल.
समर्थ न्यूरो आणि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 100+ बेड आहेत आणि हे न्यूरोलॉजिकल समस्या / आजारावरील इमर्जन्सी सर्जरीमध्ये आणि निदानामध्ये तज्ञ आहे.