ब्रेन ट्यूमर म्हणजे आपल्या मेंदूतील असामान्य पेशींची एक गाठ किंवा वाढ असते. ब्रेन ट्यूमरचे बरेच प्रकार आहेत. काही ब्रेन ट्यूमर मॅलिग्नन्ट म्हणजे घातक अथवा कॅन्सरचे नसतात, त्यांना बिनाईन ट्यूमर म्हणतात. बाकी ब्रेन ट्यूमर कॅन्सरयुक्त असतात. त्यांना मॅलिग्नंट ट्यूमर (घातक) म्हणतात.
ब्रेन ट्यूमर तुमच्या मेंदूत सुरू होऊ शकतो. त्याला प्राथमिक म्हणजे प्रायमरी ब्रेन ट्यूमर म्हणतात. कॅन्सर शरीराच्या इतर भागात होऊन तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचल्यास त्याला सेकंडरी किंवा मेटास्टॅटिक, ब्रेन ट्यूमर म्हणतात.
मेंदूत ट्यूमरची वाढ किती लवकर होते प्रत्येक ट्यूमर वर अवलंबून असते. ट्यूमरच्या वाढीचा दर तसेच मेंदूतील त्याचे स्थान यावर पेशंटच्या मज्जासंस्थेच्या कार्यावर त्याचा कसा परिणाम होईल हे अवलंबून असते.
ब्रेन ट्यूमरवरील उपचाराचे पर्याय ब्रेन ट्यूमरचा प्रकार, त्याचा आकार आणि त्याच्या स्थानावर अवलंबून असतात.
ब्रेन-ट्यूमर असलेल्या लोकांना ट्यूमरची लक्षणे आणि चिन्हे असुंही शकतात आणि नसुही शकतात. काहीवेळा ब्रेन ट्यूमर असलेल्या रुग्णांना या पैकी कोणतीही चिन्हे आणि लक्षणे दिसत नाहीत. तसेच, ब्रेन ट्यूमरच्या लक्षणांसारखीच लक्षणं आणि चिन्हे इतर रोगांच्यामुळे देखील असू शकतात.
ही लक्षणे ट्यूमरमुळे मेंदूचा एखादा विशिष्ट भाग योग्यप्रकारे कार्य करत नसल्यास येतात. ब्रेन ट्यूमरची लक्षणं ब्रेन ट्यूमरची नक्की कुठे आहे यावर अवलंबून असतात.
शरीराचा सर्वात गुंतागुंतीचा अवयव म्हणजे मेंदू, तो आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवतो आणि मेंदूचा प्रत्येक छोटासा भाग आपले अंग, चव, डोळे, हालचाल, श्रवणशक्ती इत्यादींचे महत्त्वाच्या संवेदनांचे नियंत्रण करतो.
अशाप्रकारे दृष्टी आणि डोळ्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणार्या मेंदूच्या भागामध्ये जर ट्यूमर झाला तर दृष्टी किंवा डोळ्यांच्या हालचालींवर परिणाम होईल. ब्रेन ट्यूमरच्या जागा आणि त्याच्या निगडीत विशिष्ट लक्षणांची काही उदाहरणे अशी आहेत…
जर ट्यूमर सेरेब्रमच्या फ्रंटल किंवा पेरायटल लोबमध्ये असला तर स्पर्श किंवा दाबाच्या संवेदना येत नाहीत. तसेच शरीराच्या डाव्या आणि उजव्या बाजूमध्ये गोंधळ होतो. हात किंवा पायात कमकुवतपणा येतो.
जर ट्यूमर पीनीयल ग्लॅन्ड मध्ये असला तर वर बघण्यात असमर्थता येऊ शकते.
पिच्युएटरी ट्यूमरमुळे स्त्रियांमध्ये स्तनपानाचा स्राव आणि मासिक पाळीमध्ये गडबड होऊ शकते.
पिच्युएटरी ट्यूमरमुळे शारीरीक वाढीच्या हार्मोनचे उत्पादन वाढले अथवा कमी झाले तर वाढत्या वयातील मुला–मुलींच्या हाताच्या आणि पायाच्या वाढीवर दुःशपरिणाम होतो. कोणी थिटे राहतील तर कोणी अतिशय जास्त उंच होतील.
जर ट्यूमर ब्रेन स्टेम मध्ये असेल तर गिळताना अडचण होणे, चेहर्याच्या स्नायूंना अशक्तपणा किंवा सुन्नपणा येणे व डबल व्हिजन (म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या दोन छब्या दिसणे) ही लक्षणं होऊ शकतात.
टेम्पोरल लोब, ऑक्सिपीटल लोब किंवा ब्रेन स्टेममधील ट्यूमरमुळे आंशिक दृष्टी नष्ट होणे किंवा डबल व्हिजन (प्रत्येक गोष्टीच्या दोन छब्या दिसणे) यासारखी लक्षणे उद्भवू शकतात.
जर तुम्हाला स्वत: मधील किंवा तुमच्या आप्तेष्टांमध्ये काही बदल जाणवत असतील आणि तुम्हाला त्या विषयी काळजी वाटत असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. डॉक्टर तुमच्या लक्षणांची तपशीलवार हिस्ट्री (इतिहास) घेतील, जरूर पडल्यास काही तपासण्या करतील आणि समस्येचे कारण शोधून काढतील आणि रोगाचे डायग्नोसिस (निदान) करतील.
ब्रेन ट्यूमरच्या अनेक रोग्यांचे निदान त्यांच्या विशिष्ट लक्षणांमुळे होते.
दृष्टी, गंध, श्रवण, स्पर्श आणि चव यासारख्या संवेदनांच्या कार्यात कमतरता किंवा बदल होऊ शकतो.
जेव्हा मेंदूच्या उच्च केंद्रांवर परिणाम होतो तेव्हा झोप न लागणे किंवा जास्त झोपणे, स्मरणशक्ती गमावणे, वागण्यात बदल इत्यादी परिणाम होतात. रूग्ण चालण्यात किंवा रोजची कामे करण्यातदेखील बदल अनुभवू शकतात.
ट्यूमरचा उत्तम उपचार म्हणजे अर्थातच ऑपरेशन करून ट्यूमर काढून टाकणे. पण मेंदूची गुंतागुंतीची रचना आणि ट्यूमर घातक [कॅन्सरचा] असल्यास पसरण्याची शक्यता असल्यामुळे, ट्यूमर काढून टाकणे नेहमीच शक्य नसते.
अनेक वेळा ब्रेन ट्यूमरची लक्षणं दूर करणे हाच ब्रेन-ट्यूमरवर उपचार करण्याचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. याला पॅलिएटिव्ह केअर अथवा सपोर्टिव्ह केअर म्हणतात. अशी पॅलिएटिव्ह केअर बर्याचदा निदाना नंतर लगेचच सुरू होते आणि संपूर्ण उपचाराच्या दरम्यान चालू राहते.
बर्याच टेस्टमुळे ब्रेन-ट्यूमर आणि त्याच्या प्रकारांचे निदान होण्यास मदत होते. ट्यूमर सौम्य [कॅन्सर नसलेला] किंवा घातक [कॅन्सरयुक्त] आहे की नाही हे जाणून घेणे फार महत्त्वाचे असते. ट्यूमर मेंदूमध्येच निर्माण झाला होता कि तो शरीराच्या दुसर्या भागात असलेल्या ट्युमरकडून मेंदूकडे पसरला आहे [मेटास्टेसिस], हे जाणून घेणे महत्त्वाचे असते.
ब्रेन ट्युमर दूत उत्पन्न झाला आणि शरीराच्या इतर भागात पसरला आहे की नाही हे जाणणे देखील आवश्यक असते. एक चांगली गोष्ट ही आहे की प्राथमिक (प्रायमरी) ब्रेन ट्यूमर म्हणजे मेंदूत उत्पन्न होणारा ब्रेन-ट्यूमर क्वचितच मेटास्टेसाइझ होतात म्हणजेच इतर ठिकाणी पसरतात
मेंदूच्या ट्यूमरसाठी मेंदूची तपासणी काही फक्त हात, डोळे आणि स्पर्शाने होऊ शकत नसली तरी देखील ब्रेन ट्यूमरचे निदान करण्यात मदत करण्यासाठी न्यूरोलॉजिस्ट अनेक तपासण्या करतात. शारीरिक तपासणीमध्ये संवेदना, हालचाल आणि रिफ्लेक्सीस (प्रतिक्षिप्त) वगैरे ची तपशीलवार तपासणी आणि वैद्यकीय हिस्ट्री आणि संपूर्ण शरीराची तपासणी करण्यात येते.
स्मरणशक्ती, समजावण्याचे कौशल्या व भाषा समजण्याची क्षमता, वजावाकी करता येणे, बारीक कामे करण्याचे कौशल्य वगैरे यासारख्या गोष्टींची तपासणी करून मेंदूच्या कार्यक्षमतेचे विस्तृत मूल्यांकन केले जाते. त्याच बरोबर रूग्णाच्या स्थितीचे पण मूल्यांकन केले जाते.
या टेस्ट एक्स-रे, एम. आर. आय. किंवा अल्ट्रासोनोग्राफी द्वारे केल्या जातात. नावाप्रमाणेच, या टेस्ट कवटी, मेंदू, पाठीचा कणा आणि मणक्यांच्या सावल्या दाखवतात किंवा कॉम्प्युटरने तयार केलेली त्रिमितीय प्रतिमा (थ्री-डी इमेज) दाखवतात.
बहुतेक ब्रेन ट्यूमरचे निदान लक्षणं दिसून आल्या शिवाय होत नाही, म्हणूनच सुरुवातीला ब्रेन ट्यूमर ची शंका वाटल्यास फॅमिली डॉक्टरांकडून ब्रेन ट्यूमरची प्राथमिक तपासणी करून न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घेण्यास सांगण्यात येते.
याचा अर्थ मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग असा आहे. एम.आर.आय. हे मेंदूच्या आतील भाग सूक्ष्मपणे ‘पाहण्याचे एक अतिशय अचूक आणी उत्तम साधन आहे. निष्णात रेडिऑलॉजीस्ट एम.आर.आय.च्या मदतीने 2 ते 3 mm मिलीमीटर व्यासाचे छोटे ट्यूमर देखील पाहू शकतात आणि त्याचे निदान करतात.
एम.आर.आय. कार्यप्रणालीमध्ये एक्स-रे चा वापर होत नसल्यामुळे, हे निदानाचे सर्वात सुरक्षित साधन मानले जाते.
एम.आर.आय. इमेजिंगमध्ये अधिक माहिती मिळण्यासाठी व स्पष्ट चित्र दिसण्यासाठी एम.आर.आय. स्कॅनपूर्वी ‘कॉन्ट्रास्ट मिडीयम’ नावाचे विशेष डायच इंजेक्शन वाटे अथवा किंवा तोंडावाटे दिला जातो.
एम.आर.आय. मेंदू, पाठीचा कणा किंवा दोन्हींचा असू शकतो. नक्की कुठला एम.आर.आय. काढायचा हे ट्यूमरच्या प्रकारावर आणि तो मध्यवर्ती मज्जासंस्थेमध्ये (सेन्ट्रल नरवस सिस्टम मध्ये) पसरण्याची कितीपत शक्यता आहे यावर अवलंबून असते.
एम.आर.आय. स्कॅनचे विविध प्रकार आहेत, पेशंटसाठी कोणता प्रकार उत्तम आहे हे उपचार करणारे डॉक्टर ठरवतात.
हे एम.आर.आय. सारखेच असते परंतु यामध्ये एक्स-रे किरण वापरले जाता. CT स्कॅन तपासणीसाठी कॉन्ट्रास्ट मिडीयम इंजेक्शन देखील दिले जाऊ शकते. मेंदू आणि मणक्यांच्या तपासणीसाठी सामान्यत: एम.आर.आय. हे CT स्कॅनपेक्षा अधिक अचूक मानले जाते.
परंतु एम.आर.आय. टेस्ट करता येणे शक्य नसल्यास इमेजिंगसाठी सी.टी. स्कॅन हा एकच पर्याय आहे, हृदयासाठी पेसमेकर असलेले किंवा हाडांमध्ये स्टील इम्प्लांट (रोपण) असलेल्या पेशंटची तपासणी एम.आर.आय. स्कॅनद्वारे केली जाऊ शकत नाही.
तसेच खूप गंभीर रीते आजारी रूग्णांची एम.आर.आय. तपासणी होउ शकत नाही कारण एम.आर.आय. तपासणीला ४० ते ६० मिनिटे लागतात.
सी.टी. स्कॅनची मेंदूत रक्तस्त्राव (सेरेब्रल हेमरेज) आणि मेंदूतील द्रव भरलेल्या जागांचा आकार वाढला झाला आहे का हे पहाण्यास मदत होते. मेंदूतील द्रव भरलेल्या जागांना सेरेब्रल वेंट्रिकल्स म्हणतात. कवटीच्या हाडातील बदल देखील सी,टी. स्कॅनवर दिसू शकतात आणि याचा वापर ट्यूमरचा आकार मोजण्यासाठी केला जाऊ शकतो.
ब्रेन ट्यूमरचे निदान करण्यासाठी सर्वोत्तम टेस्ट म्हणजे बायोप्सी, म्हणजेच, ट्यूमरचा एक बारीक तुकडा काढून त्याची पॅथॉलॉजी प्रयोगशाळेत तपासणी करणे. ट्युमर हा प्राथमिक (प्रायमरी) ब्रेन-ट्यूमर आहे कि तो शरीराच्या दुसर्या भागातील मेटास्टॅटिक ट्यूमर आहे हे शोधण्यात बायोप्सीची खूप मदत होते.
बायोप्सी सहसा शस्त्रक्रियेद्वारे केली जाते. टिश्यूचा एक छोटासा नमुना टेस्टसाठी घेतला जातो. परंतु मेंदूचे नुकसान होण्याच्या भीतीने अनेक वेळा बायोप्सी करणे शक्य नसते आणि म्हणूनच इतर टेस्ट केल्या जातात.
पेट स्कॅन म्हणजे पॉझीट्रॉन एमिशन टोमोग्राफी. अल्प प्रमाणातील रेडिओअॅक्टिव्ह (किरणोत्सर्गी) पदार्थ पेशंटच्या शरीरात घातले जातात. हे पदार्थ सक्रियपणे विभाजन करणार्या पेशीद्वारे, म्हणजे ट्यूमर पेशीद्वारे शोषले जातात. म्हणजेच ट्यूमर पेशी तंदूरुस्त पेशीं पेक्षा रेडिओअॅक्टिव्ह (किरणोत्सर्गी) पदार्थ जास्त प्रमाणात शोषून घेतात.
पेट स्कॅनर शरीराच्या आतील इमेज (प्रतिमा) तयार करण्यासाठी हा पदार्थ शोधतो व ट्यूमर चा आकार दिसू शकतो. उपचारादरम्यान काही आठवडे किंवा काही महिन्यांनंतर ट्यूमरचा आकार वाढतो आहे की कमी होतो आहे ते पेट स्कॅन दाखवतो. पेट स्कॅन मशीनमध्ये सी,टी.स्कॅन तपासणी देखील होऊ शकते आणि बर्याचदा दोन्ही टेस्ट (सी.टी. स्कॅन व पेट स्कॅन) एकत्र केल्या जातात.
या तपासणीत पाठ व कंबरेच्या दोन मणक्यांमधून सुई घालून स्पाईनल कॉर्डच्या आजुबाजुचे द्रवपदार्थ (ज्याला सेरेब्रो स्पाईनल फ्लुइड CSF सी.एस.एफ. म्हणतात) काढून त्या द्रवपदार्थाचा नमुना तपासणीसाठी पाठवतात. ब्रेन ट्यूमरच्या काही पेशंटच्या सी.एस.एफ.ची सूक्ष्म तपासणी ट्यूमर पेशी आणि त्यांचे प्रकार दर्शवते, आणि निदान करण्यास सोपे होते. सी.एस.एफ.च्या तपासणीत ट्यूमर मार्कर किंवा बायोमार्करची उपस्थिती दिसुं शकते.
काही विशिष्ट प्रकारचा ट्यूमर असलेल्या पेशंटमध्ये रक्त, मूत्र, सी.एस.एफ., प्लाझमा किंवा पेशंटच्या इतर शारीरिक द्रवांत हे ट्यूमर मार्कर सामान्य प्रमाणांपेक्षा जास्त प्रमाणात आढळतात.
शरीराच्या इतर भागांमधील बहुतेक प्रकारच्या ट्यूमरसाठी स्टेजिंग किंवा ग्रेडिंग सिस्टम वापरली जाते. स्टेजिंग सिस्टममध्ये ट्यूमर कुठे स्थित आहे, असल्यास तो कुठे पसरला आहे आणि शरीराच्या इतर भागावर त्याचा परिणाम होत आहे की नाही हे ठरवता येते.
प्रौढ वयाच्या रूग्णांच्या प्राथमिक (प्रायमरी) ब्रेन ट्यूमरसाठी कोणतीही स्टेजिंग सिस्टम उपलब्ध नाही, कारण बहुतेक प्राथमिक (प्रायमरी) ब्रेन-ट्यूमर मध्यवर्ती मज्जासंस्थेच्या (Central Nervous System) पलीकडे पसरत नाहीत.
मेंदूच्या ट्यूमरची ग्रेडिंग सिस्टम हे निर्धारित करते कि, ट्युमर किती प्रमाणात कॅन्सरयुक्त (घातक) आहे आणि ते वाढण्याची शक्यता किती आहे.
प्रौढांमध्ये मेंदू किंवा पाठीच्या कण्यात सुरु झालेला ट्यूमर जरी कॅन्सरयुक्त असला तरी देखील शरीराच्या इतर भागामध्ये क्वचितच पसरतो. पण तो मध्यवर्ती मज्जासंस्थेमध्ये (Central Nervous System) पसरू शकतो.
यामुळे सामान्यपणे शरीराच्या इतर अवयवांच्या तपासण्या करण्याची आवश्यकता नसते. (यात काही अपवाद आहेत). मेंदूच्या किंवा पाठीच्या कण्याच्या इतर भागामध्ये पसरलेल्या ट्यूमरचा परिणाम गंभीर होऊ शकतो.
ब्रेन ट्यूमरची संपूर्ण उपचार योजना तयार करण्यासाठी वेगवेगळे वैद्यकीय तज्ञ एकत्र काम करतात. यामुळे विविध प्रकारच्या उपचारांचा समन्वय साधता येतो.
उपचारांचे पर्याय अनेक घटकांवर अवलंबून असतात:
शस्त्रक्रियेनंतर ट्यूमर शिल्लक असल्यास रेडिएशन थेरपी आणि केमोथेरपी वापरली जाऊ शकते.
जास्त गंभीर ट्यूमरसाठी उपचाराची सुरुवात सामान्यत: शस्त्रक्रियेने होते, त्यानंतर रेडिएशन थेरपी आणि केमोथेरपी दिली जाते.
ब्रेन-ट्यूमरवर यशस्वीरित्या उपचार करणे आव्हानात्मक असू शकते. शरीरातील रक्त प्रवाह आणि मेंदू या मध्ये एक अडथळ असतो ज्या ब्लड-ब्रेन बॅरीयर असे म्हणतात. हे बॅरीयर सामान्यत: मेंदू आणि पाठीचा कण्याचे (स्पायनल कॉर्डचे) रक्तात असलेल्या हानिकारक रसायनांपासून संरक्षण करते. तसेच ब्लड-ब्रेन बॅरीयर अनेक प्रकारच्या किमोथेरपीच्या औषधांना देखील मेंदूत जाऊ देत नाही. त्यामुळे किमोथेरपी कधी कधी यशस्वी होत नाही.
ट्यूमर जर मेंदू किंवा पाठीच्या कण्याच्या एखाद्या नाजूक भागाजवळ असेल तर शस्त्रक्रिया करणे कठीण होऊ शकते आणि त्यामुले शस्त्रक्रिया यशस्वी होऊ शकत नाही. सर्जनने मूळ ट्यूमर पूर्णपणे काढून टाकला असेल तरीदेखील ट्यूमरचे काही भाग अत्यंत लहान असतात आणि ते शस्त्रक्रिया करताना दिसत नाहीत किंवा काढले जाऊ शकत नाहीत.
रेडिएशन थेरपीमुळे निरोगी टिश्यूचे देखील नुकसान होऊ शकते. अशा प्रकारे तिन्ही प्रकारच्या उपचारात काही वेळा अडचणी येऊ शकतात.
समर्थ न्यूरो आणि ट्रामा केअर हॉस्पिटल येथे संपूर्ण ब्रेन ट्यूमर उपचार उपलब्ध आहे.
ब्रेन-ट्यूमर आणि त्याच्या उपचारांमुळे शारिरीक लक्षणं आणि इतर दुष्परिणाम होतात तसेच भावनिक, सामाजिक आणि आर्थिक परिणाम होतात.
या सर्व परिणामांचे व्यवस्थापन करणे यालाच पॅलिएटिव्ह केअर किंवा सपोर्टिव्ह केअर असे म्हणतात. रूग्णाचा उपचार करण्याचा हा एक महत्त्वाचा भाग आहे व ह्याच्यातच ट्यूमरचा आकार कमी करणे, त्याची वाढ थांबवणे किंवा तो काढून टाकणे या उपचारांचा देखील पॅलिएटीव केर मध्ये समावेश आहे.
पॅलिएटिव्ह केअर मध्ये रूग्णाला उपचारादरम्यान कशा प्रकारे कमीत कमी त्रास होईल व त्याला बरे वाटेल आणि त्याची एकूण स्थिती सुधारण्यावर आणि रूग्णाच्या कुटुंबियांना सर्वप्रकारे मदत करण्यावर भार दिला जातो. पॅलिएटिव्ह केअर देण्यास वय मर्यादा, ट्यूमरची स्टेज अथवा प्रकार याचा विचार न करता दिली जाऊ शकते.
ब्रेन-ट्यूमर निदानानंतरच लगेचच ही सुरू केल्यास बर्याचवेळा उत्कृष्ट परिणाम होतो. ज्या लोकांना ट्यूमरच्या उपचारासह पॅलिएटिव्ह केअर प्राप्त होते त्यांना बहुतेकदा तीव्र लक्षणं कमी असतात, त्यांची जीवनशैली बरी असते आणि त्यांना उपचारांमुळे अधिक बरे वाटते.
पॅलिएटिव्ह केअर वेगवेगळ्या प्रकारची असु शकते आणि बहुतेक वेळा औषधोपचार, पौष्टिक आहार, विविध प्रकारे रिलॅक्सेशन थेरपी, भावनिक आणि आध्यात्मिक साथ आणि इतर उपचारांचा समावेश असतो. ट्यूमरच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी किमोथेरपी, शस्त्रक्रिया किंवा रेडिएशन सारखे उपचार देखील पॅलिएटिव्ह केअर म्हणून दिले जाऊ शकतात.
ब्रेन ट्यूमरची काही लक्षणं तीव्र असू शकतात आणि त्याचा रूग्णावर आणि रूग्णाची काळजी घेणार्या लोकांवर त्यांच्या दैनंदिन जीवनात खूप दुष्परिणाम होऊ शकतो. औषधांच्या वापराने लक्षणं कमी केली जाऊ शकतात. ब्रेन ट्यूमर असलेल्या लोकांसाठी सपोर्टिव्ह केअर मध्ये खालील गोष्टी वापरल्या जातात:
कॉर्टिकोस्टिरॉईड्स: मेंदूतील सूज कमी करण्यासाठी वापरली जाते
सिझ्यर्स कमी करणारी औषधे
डॉक्टर वरील औषधांचे दुष्परिण समजावतात व त्याचा उपास सांगतात.
शस्त्रक्रिया म्हणजे ट्यूमर आणि आसपासचे काही निरोगी टिश्यू काढून टाकणे. सामान्यत:ब्रेन-ट्यूमरच्या उपचाराचा हा पहिला टप्पा आहे. साध्या ब्रेन-ट्यूमरसाठी बहुतेक वेळा शस्त्रक्रिया हा एक एकमेव उपचार पुरतो. ट्यूमर काढून टाकल्याने न्यूरोलॉजिकल लक्षणं कमी होऊ शकतात, तसेच निदान करण्यास व अनुवांशिक विश्लेषण करण्यासाठी (बायोप्सी साठी) शस्त्रक्रिया करून काढलेला ट्यूमरचा उपयोग होतो.
लॅब तपासणी करून उरलेल्या ब्रेन ट्यूमरचा उपचार अधिक प्रभावी रिते करता येतो. बर्याच वेळा ब्रेन ट्युमरच्या निदानात फरक पडू शकतो आणि उपचार बदलू शकतात.
ब्रेन ट्यूमरची शस्त्रक्रिया न्यूरोसर्जन करतात. मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यासाठी ते ऑपरेटिंग मायक्रोस्कोप आणि अल्ट्रासोनिक कॉगुलेशन आणि कटिंग डिव्हाइसेस, कॉम्प्युटर नेव्हिगेशन आणि इमेज इंटेंसिफायर टेलिव्हिजन [IITV] यासारखी गुंतागुंतीची यंत्रसामग्री वापरतात.
मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यासाठी कवटीचा भाग काढून टाकणे आवश्यक असते, या प्रक्रियेला क्रॅनोओटोमी म्हणतात. सर्जनने ट्यूमर काढून टाकल्यानंतर, कवटीचे झाकण उपलब्ध नसल्यास कवटीचा उघडा भाग बंद करण्यासाठी रूग्णाची इतर हाडे वापरली जाऊ जातात.
काहीवेळा पेशंटच्या कवटीचे झाकण ऑपरेशन नंतर लगेच कवटीला जोडणे हितावह नसते. अशा वेळी ते ऑपरेशन थिएटरमध्ये जतन केले जाते किंवा पेशंटच्या उदरात रोपण केले जाते.
नवीन तंत्रज्ञानामुळे मेंदूची शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित आणि अधिक यशस्वी झाली आहे.
काहीवेळा, शस्त्रक्रिया करता येत नाही कारण ट्यूमर जिथे आहे, तिथपर्यंत सर्जन पोहचूच शकत नाही. कधी ट्यूमर एखाद्या महत्त्वपूर्ण अवयवा जवळ असतो. अशा ट्यूमरना अनऑपरेबल (शस्त्रक्रिया करता येत नाही) असे ट्यूमर म्हटले जाते.
ट्यूमर जर अनऑपरेबल (शस्त्रक्रियेने बरा न होणारा) असेल तर डॉक्टर इतर उपचारांच्या पर्यायांचा सल्ला देतात. अशा वेळी बायोप्सी करणे किंवा ट्यूमरचा थोडा भाग काढून टाकणे असेही होऊ शकते.
रेडिएशन थेरपी म्हणजे उच्च-उर्जा असलेले एक्स-रे किंवा इतर कणांचा मारा करून ट्यूमर नष्ट करणे किंवा ब्रेन-ट्यूमरच्या वाढीची गती कमी करणे किंवा थांबविणे. रेडिएशन थेरपी सामान्य पणे शस्त्रक्रियेनंतर आणि किमोथेरपी बरोबर दिली जाते.
ट्यूमरच्या उपचारांसाठी रेडिएशन थेरपी देणार्या तज्ञ डॉक्टरांना ‘रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट’ म्हणतात.
रेडिएशन उपचार सर्वाधीक वापरला जाणारा प्राकार म्हणजे एक्सटर्नल-बीम रेडिएशन थेरपी. यात शरीराच्या बाहेरून रेडियेशन मशीनमधून रेडिएशन थेरपी दिली जाते.
जेव्हा इम्प्लांट्स (रोपण) चा वापर करून रेडिएशन थेरपी दिली जाते तेव्हा त्याला अंतर्गत (इंटर्नल) रेडिएशन थेरपी किंवा ब्रॅकी थेरपी म्हणतात.
रेडिएशन थेरपी सामान्यत: विशिष्ट कालावधीत विशिष्ट वेळा दिली जाते.
रेडिएशन थेरपीचे बरेच प्रकार आहेत, या वेगवेगळ्या उपचार पद्धतीं द्वारा डॉक्टर अत्यंत अचूक पणे आणि आसपासच्या निरोगी मेंदूच्या भागावर रेडिएशनचा मारा न देता उपचार करू शकतात. भविष्यात फक्त हा अचूक पणा अधिक वाढेल.
ट्यूमरच्या आकार आणि स्थानानुसार रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट सर्वात योग्य रेडिएशन तंत्र निवडू शकतात. काही वेळा वेगवेगळ्या प्रकारचे उपचार एकापाठोपाठ देऊन उत्कृष्ट कार्य होऊ शकते.
रेडिएशन थेरपीने थकवा, त्वचेवर सौम्य रिअॅक्शन, केस गळणे, पोट खराब होणे आणि स्मरणशक्तीच्या समस्यासारखी न्यूरोलॉजिक लक्षणं असे अल्पकालीन दुष्परिणाम (साइड इफेक्ट्स) येऊ शकतात. बरेच दुष्परिणाम उपचार संपल्यानंतर लवकरच बंद होतात.
पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी रेडिएशन थेरपी वापरली जात नाही कारण त्यांच्या वाढ होणाऱ्या मेंदूवर रेडियेशनने नुकसान होण्याची शक्यता असते.
रेडिएशन थेरपीचे दिर्घ काळ टिकणारे दुष्परिणाम निरोगी टिश्यूवर किती रेडिएशन लागले आहे यावर अवलंबून असते. दिर्घ काळ टिकणारे दुष्परिणाम म्हणजे स्मृती कमी होणे, हार्मोनल समस्या येणे, आणि गुंतागुंतीची कार्ये समजून घेणे आणि करणे अवघड होते. तसेच विचार प्रक्रियांमध्ये होऊ शकतो.
औषधोपचारपद्धतीने ट्यूमर बरा करण्याच्या उपचाराला किमोथेरपी म्हणतात. शरीरभर ट्यूमर पेशी पर्यंत पोहोचण्यासाठी किमोथेरपीची औषधे नसाद्वारे दिली जातात. किमोथेरपीच्या तज्ञ डॉक्टरांना मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट म्हणतात.
किमोथेरपी सुई वापरुन शिरामध्ये बसवलेल्या इंट्राव्हेनस (IV) ट्यूब द्वारा किंवा तोंडी गोळ्याअथवा कॅप्सूल देण्यात येते. सतत किमोथेरपी द्यायची असल्यास शरीरात कॅथेटर किंवा पोर्ट बसवुन त्याच्यातून औषधोपचार केला जाऊ शकतो. किमो-पोर्ट बसवले असल्यास रूग्णाला औषध देणे सोपे जाते.
ट्यूमर वाढतो आहे की कमी होत आहे ह्याची तपासणी करण्यासाठी केमोथेरपी दरम्यान दर दोन-तीन महिन्यांनी एम.आर.आय. द्वारे पेशंटच्या मेंदूचे परीक्षण केले जाते.
किमोथेरपीचे दुष्परिणाम (साइड इफेक्ट्स) व्यक्तीवर आणि वापरल्या जाणार्या डोसवर अवलंबून असतात. थकवा, संसर्गाचा (इन्फेकशनचा) धोका, मळमळ आणि उलट्या होणे, केस गळणे, भूक न लागणे आणि अतिसार ही लक्षणे असू शकतात. हे दुष्परिणाम (साइड इफेक्ट्स) सामान्यत: उपचार संपल्यानंतर बंद होतात.
क्वचित विशिष्ट औषधांमुळे श्रवणशक्ती कमी होऊ शकते तर इतर काही औषधांमुळे मूत्रपिंडाचे नुकसान होऊ शकते. मूत्रपिंडाचे संरक्षण करण्यासाठी अशा रूग्णांना नसेतून जास्त प्रमाणात द्रवपदार्थ दिले जाऊ शकतात.
ठरलेल्या किमोथेरपी व्यतिरिक्त, लक्ष्यित उपचार (टार्गेटेड थेरपी) ही एक नवी उपचार पद्धती विकसीत झाली आहे. ही औषधे ट्यूमरच्या विशिष्ट जीन्स, प्रथिने किंवा टिश्यूच्या वातावरणाला लक्ष्य (टार्गेट) करते. यामुळे ट्यूमर वाढत नाही आणि नाहीसाही होऊ शकतो. किमोथेरपीचा हेतु असतो ट्यूमर पेशींची वाढ आणि प्रसार थांबवणे आणि निरोगी पेशींचे कमीत कमी नुकसान होऊ देणे.
सर्व ट्यूमरचे लक्ष्य (टार्गेट) समान नसते, आणि काही ट्यूमरला एका पेक्षा जास्त लक्ष्य असू शकतात. सर्वात प्रभावी उपचार शोधण्यासाठी डॉक्टर रूग्णाच्या ट्यूमरमधील जीन्स, प्रथिने आणि इतर घटक ओळखण्यासाठी टेस्ट करवू शकतात. यामुळे डॉक्टरांना जेव्हा शक्यतो प्रत्येक पेशंटला त्याच्या साठीचे सर्वात प्रभावी औषधोपचार देता येतात.
याव्यतिरिक्त, संशोधन अभ्यासाद्वारे विशिष्ट म़ॉलीक्युलर टार्गेट्स वर नवीन उपचारांचा शोध घेणे चालू आहे. रूण्गांनी अश्या नव्या प्रकारच्या उपचारांची शक्य होईल तेवढी माहिती घेणे हितावह असते.
ब्रेन ट्यूमरसाठी, 2 प्रकारच्या लक्ष्यित उपचार (टार्गेटेड थेरपी) वापरले जाऊ शकतात:
ब्रेन-ट्यूमर तात्पुरते किंवा कायमचे नष्ट होऊ शकतात. बहुतेक प्राथमिक (प्रायमरी) ब्रेन ट्यूमरमध्ये, जरी इमेजिंग टेस्ट ट्यूमरची वाढ नियंत्रित असते असे दर्शवत असल्या अथवा ट्यूमर असल्याची काही चिन्हे दाखवत नसल्या तरी प्राथमिक (प्रायमरी) ब्रेन-ट्यूमर पुन्हा होऊ शकतो.
ट्यूमरची पुनरावृत्ती होत आहे का हे पाहण्यासाठी पेशंटना सतत एम.आर.आय. स्कॅन करत राहावे लागते. या अनिश्चिततेमुळे ट्यूमर परत येईल याची चिंता अनेकांना असते.
ट्यूमर परत येण्याच्या शक्यतेबद्दल डॉक्टरच योग्य माहिती देऊ शकतात. आपल्याला पुन्हा ब्रेन-ट्यूमर होण्याचा धोका आहे हे समजून घेण्याने जर ट्यूमर परत आला तर रूग्णाची व त्याच्या कुटुंबीयांची तयारी असण्यात मदत होते.
होऊ शकेल. प्राथमिक (प्रायमरी) ब्रेन-ट्यूमर जर पुन्हा झाला तर काय करावयाचे याची माहिता गोळ करणे हितावह असते.
उपचारानंतर ट्यूमर परत येण्यास रीकरंट ट्यूमर (वारंवार येणारा ट्यूमर) असे म्हणतात. रीकरंट ब्रेन-ट्यूमर साधारणत: जिथे मूळ सुरुवात झाली होती त्या जागेच्या जवळ येतो. क्वचितच, तो दुसर्या ठिकाणी किंवा इतर बर्याच ठिकाणी परत येऊ शकतो, ज्याला मल्टीफोकल रीकरन्स (बहुपक्षीय पुनरावृत्ती) म्हणतात.
जेव्हा असे होते तेव्हा ट्यूमर बद्दल शक्य तितके अधिक जाणून घेण्यासाठी पुन्हा तपासण्यांचे एक नवीन चक्र सुरू होते. टेस्ट पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांबरोबर उपचार पर्यायांबद्दल चर्चा सुरू होते. उपचार योजनेत वर वर्णन केलेले उपचारच असतात, म्हणजे शस्त्रक्रिया, रेडिएशन थेरपी, किमोथेरपी आणि लक्ष्यित थेरपी (टार्गेटेड थेरपी).
परंतु दुसर्यांदा दिलेले उपचार वेगळ्या संयोजनात किंवा वेगळ्या गतीने दिले जातात. उपचारांबरोर नवीर उपचारांच्या प्रायोगीक चांचणीत (ज्याला क्लिनिकल ट्रायल्स म्हणतात) देखील रूग्ण सहभागी होऊ शकतात.
रीकरंट (वारंवार येणारा) ब्रेन-ट्यूमरवर उपचार करण्याचा कोणताही एकच उपाय अस्तित्वात नाही. उपचार योजना बर्याच घटकांवर आधारित असते. कोणतीही उपचार योजना निवडली तरीदेखील, लक्षणं आणि दुष्परिणामांपासून मुक्त होण्यासाठी पॅलिएटिव्ह केअर घेणे महत्वाचे आणि आवश्यक असते.
डॉक्टर रूग्णाला ब्रेन ट्यूमरवर उपचार करण्यासाठी टेस्ट करण्यात येणाऱ्या नवीन औषधांच्या क्लिनिकल ट्रायल्ससाठी मध्ये भाग घेण्यास सुचवू शकतात, यामुळे रीकरंट (वारंवार होणार्या) ब्रेन ट्यूमरच्या उपचारात मदत होऊ शकते. यातील बर्याच नवीन औषधांना मॉलीक्युलर टार्गेटेड थेरपी म्हणतात.
याची औषधे तोंडाने घेतली जाऊ शकतात व ब्रेन ट्यूमर पेशींचे विशिष्ट भाग लक्ष्यित (टार्गेट) करू शकतात. या नवीन औषधांची तपासणी स्वतंत्रपणे केली जाते किंवा नेहमीच्या केमोथेरपीबरोबर केली जाते. बर्याच रूग्णांना क्लिनिकल ट्रायल मध्ये भाग घेऊन फायदा होतो.
रीकरंट (वारंवार येणार्या) ब्रेन ट्यूमरच्या रोग्यांना अविश्वास किंवा भीती सारख्या भावना सतावू शकतात. रीकरंट ब्रेन-ट्यूमरचे निदान व उपचार करवून घेतांना रोग्यांना खूप मानसिक तणावाचा सामना करावा लागतो आणि काही वेळा ते सहन करणे फार कठीण होते. या परिस्थितीतून पुढे जाण्यासठी वैद्यकिय टीमसह काउंसेलिंग करवून घेणे व इतर पेशंटशी बोलणे हे खूप उपयुक्त ठरते.
जर कॅन्सर दुसर्या ठिकाणाहून सुरु झाला आणि तिथपासून मेंदू किंवा सेन्ट्रल नर्वस सिस्टम पर्यंत पसरला तर त्याला मेटास्टॅटिक कॅन्सर किंवा सेकंडरी ब्रेन ट्युमर म्हणतात. असे झाल्यास कॅन्सर तज्ञाचा सल्ला व उपचार आवश्याक असतो. सर्वोत्कृष्ट उपचार योजनेबद्दल तज्ञ डॉक्टरांची मते भिन्न असू शकतात. बर्याच केसेस मध्ये क्लिनिकल ट्रायल्स हा एक पर्याय असू शकतो.
उपचार सुरू करण्यापूर्वी दुसर्या कॅन्सर तज्ञाचा सल्ला घेणे नक्कीच हितावह असते. असे केल्याने म्हणजे तुम्हाला तुम्ही निवडलेल्या उपचार योजनेसंदर्भात सुरक्षित वाटू शकेल.
उपचार योजनेत शस्त्रक्रिया, रेडिएशन थेरपी, लक्ष्यित थेरपी आणि इम्युनोथेरपी यांचे मिश्रण असू शकते, जे ट्यूमरशी लढण्यासाठी शरीराच्या नैसर्गिक बचावांना चालना देण्यासाठी बनवलेल्या उपचारांचा एक प्रकार आहे. इम्यूनोथेरपीविषयी खाली दिल्याप्रमाणे आणि या गाईडच्या नवीन संशोधन विभागा (लेटेस्ट रिसर्च सेक्शन) मध्ये अधिक जाणून घ्या.
जर कॅन्सर शरीराच्या दुसर्या भागापासून मेंदूपर्यंत पसरला तर त्याला ब्रेन मेटास्टेसिस म्हणतात. ब्रेन मेटास्टेसिसवर पारंपारिक शस्त्रक्रिया किंवा रेडिएशन थेरपीद्वारे उपचार केला जातो. केमोथेरपी बहुधा वापरली जात नाही कारण रक्त-मेंदूचे अडथळे (ब्लड-ब्रेन बॅरियर) अनेक औषधे मेंदूपर्यंत पोहोचू देत नाही.
पूर्वीच्या काळी, रेडिएशन थेरपी काम करत नसली तरच किमोथेरपीचा वापर केला जात असे. ब्रेन मेटास्टेसीसच्या उपचारांसाठी शस्त्रक्रिया करतात. बर्याचदा ऑपरेशन नंतर रेडिएशन थेरपी दिली जाते.
समर्थ न्यूरो आणि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 100+ बेड आहेत आणि हे न्यूरोलॉजिकल समस्या / आजारावरील इमर्जन्सी सर्जरीमध्ये आणि निदानामध्ये तज्ञ आहे.