– कोणत्याही शस्त्रक्रियेच्या अगोदर, मग ती मेंदूची असो अथवा इतर कुठल्या अवयवाची असो, रुग्णाचा सविस्तर वैद्यकीय इतिहास घेण्यात येतो. रुग्णाचे वय, आरोग्य स्थिती, आणि मस्तिष्काच्या समस्या यांचा विचार केला जातो.
– विविध चाचण्या, जसे की MRI, CT स्कॅन, आणि इतर तंत्रज्ञानांचा वापर करून मस्तिष्काचे चित्र घेतले जाते.
– रूग्णाच्या अनेक लॅबरॉटरी तपासण्या पण केल्या जातात. या तपासण्यांत काही अंक कमी जास्त असले तर लगेच त्यावर उपाय करण्यात येतात. जर रक्तातील हेमोग्लोबीन कमी असेल तर कधी ब्लड ट्रन्सफ्युजन देण्यात येते.