स्ट्रोक झाल्यानंतर त्वरित उपचार घेणे अत्यावश्यक आहे. उपचार सुरू करण्यासाठी लागलेली वेळ जितकी कमी असेल, तितकी स्ट्रोकच्या दुष्परिणामांची तीव्रता कमी होऊ शकते. पहिल्या तासामध्ये केलेले उपचार विशेषतः मेंदूवरील नुकसान कमी करण्यास मदत करतात. स्ट्रोक झाल्यानंतर रुग्णाला लगेच सीटी स्कॅन आणि एमआरआय स्कॅनची आवश्यकता असते. यामुळे मेंदूतील समस्या समजून घेऊन उपचाराची दिशा ठरवता येते.
तसेच, योग्य उपचारासाठी तज्ञ डॉक्टर आणि सुसज्ज इस्पितळाची गरज असते. स्ट्रोकसारख्या गंभीर अवस्थेसाठी विशेष सुविधा असलेल्या हॉस्पिटलमध्ये जाणे हेच हितावह आहे. अशा हॉस्पिटलमध्ये अनुभवी डॉक्टर आणि मेंदू रोग तज्ञ उपब्ध असतात जे स्ट्रोकचे त्वरित निदान आणि योग्य उपचार करू शकतात.