डोक्याला दुखापत होणे म्हणजे मेंदू, डोके किंवा टाळू यांना झालेली कोणतीही इजा होय. हे मेंदूच्या दुखापतीसह सौम्य सूज किंवा टेंगुळ, जखम किंवा कवटीचे फ्रॅक्चर असू शकते. दुखापतीमुळे डोक्यावर आलेल्या टेंगुळाला ‘कंकशन’ म्हणतात, टाळूवर जखम झाली असल्यास त्या जखमांना ‘स्कल्प वुन्ड्स’ म्हणतात. कवटीच्या हाडांना तडा गेला असल्यास त्याला ‘स्कल फ्रॅक्चर’ म्हणतात.
वर नमूद केलेल्या तीन प्रकारच्या दुखापतींचे परिणाम मोठ्या प्रमाणात बदलू शकतात, परंतु मुळात हे सर्व डोक्याच्या दुखापतीच्या तीव्रतेवर अवलंबून असते.
गंभीर प्रकरणांमध्ये दुखापतीमुळे कवटीला टीच गेलेली असू शकते. अशा दुखापतीला ‘ओपन किंवा पेनिट्रेटिंग हेड इंज्युरी’ म्हणतात आणि मेंदूला दुखापत होऊ शकते. या प्रकारची दुखापत फार गंभीर असते हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
डोक्याच्या दुखापतीचे गांभीर्य निर्धारित करण्यासाठी फक्त शारीरिक तपासणी करून भागत नाही. टाळूवरील कोणत्याही जखमेतून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्यास तो फार गंभीर वाटू शकतो, परंतु हे वाटते तितके गंभीर नसते, शस्त्रक्रिया करून टाके घातल्यास ही जखम हमखास बरी होते . परंतु रक्तस्त्राव होत नसताना देखील डोक्याला गंभीर दुखापत असुं शकते आणि त्यामुळे कवटीत प्रेशर वाढुं शकते आणि जीवाला खूप धोक असतो.
बहुतेक प्रकरणांमध्ये, आपली कवटी आपल्या मेंदूचे गंभीर हानीपासून संरक्षण करते. परंतु जर कवटीला दुखापत झाली असेल तर मेंदूला नुकसान होऊ शकते. डोक्याच्या दुखापतीबरोबर अनेक वेळा पाठीच्या कण्याला देखील दुखापत होते.
हेमेटोमा म्हणजे रक्तवाहिन्याबाहेर रक्त साठणे. मेंदूत हिमेटोमा झाल्यास ते खूप गंभीर असू शकते. रक्ताच्या साठण्या मुळे तुमच्या कवटीच्या आत प्रेशर वाढू शकते. यामुळे तुम्ही चेतना गमवू शकता किंवा मेंदूला कायमस्वरुपी नुकसान होऊ शकते किंवा अर्धांगवायू होऊ शकतो आणि / किंवा शरीराच्या काही भागात संवेदना कमी होऊ शकतात.
हेमरेज हा अनियंत्रित रक्तस्त्राव असतो. तुमच्या मेंदूच्या सभोवतालच्या जागेत रक्तस्त्राव होऊ शकतो ज्याला ‘सब-एरेकनॉइड हेमरेज’ [SAH] म्हणतात. जर मेंदूच्या टिश्यूमध्ये रक्तस्त्राव झाला तर त्याला ‘इंट्रासेरेब्रल हेमरेज’ म्हणतात. दोन्ही इजा गंभीर असतात.
सब-एरेकनॉइड हेमरेजमुळे बऱ्याचदा डोकेदुखी आणि उलट्या होतात. इंट्रासेरेब्रल हेमरेजची तीव्रता किती रक्तस्त्राव झाला यावर अवलंबून असते, परंतु कितीही प्रमाणात रक्तस्त्राव झाला असल्यास कालांतराने तो कवटीच्या आत प्रेशर वाढवू शकतो आणि रुग्णाची परिस्थिती गंभीर होते.
डोक्याला झालेली दुखापत गंभीर स्वरूपाची असल्यास मेंदूला धक्का बसू शकतो. तुमचे डोके अचानक कडक पृष्ठभागावर आपटले गेल्यास किंवा अचानक खेचले किंवा ओढले गेल्यास मेंदूला धक्का बसू शकतो. मेंदूला धक्का बसल्यानंतर एखाद्या अवयवाच्या कार्यशक्तीवर परिणाम होऊ शकतो, मात्र हे बऱ्याचदा तात्पुरत्या स्वरूपाचे असते. परंतु मेंदूला वारंवार धक्का बसल्यास मेंदूचे कायमस्वरुपी नुकसान होऊ शकते.
इडिमा म्हणजे सूज. मेंदूच्या कोणत्याही दुखापतीमुळे मेंदूला सूज येऊ शकते. शरीरात कुठेही दुखापत झाल्यास आसपासच्या भागाला सूज येते, परंतु हे मेंदूत घडल्यास ही एक गंभीर परिस्थिती असू शकते. याचे कारण असे आहे की, कवटी घट्ट पेटीसारखी असते आणि म्हणून त्यात सूज सामावून ती ताणली जाऊ शकत नाही. यामुळे कवटीच्या आत भागत प्रेशर वाढते, ज्याला हाय इंट्राक्रॅनिअल प्रेशर (कवटीच्या आतील उच्च दाब) म्हणतात. याचा परिणाम म्हणजे मेंदू कवटीवर आतल्या बाजूने दाबला जातो.
कवटीच्या हाडांना अस्थिमज्जा(बोन मॅरो) नसते. त्यामुळे कवटी वजनाला हलकी असते परंतु फार मजबूत असते आणि सहजरित्या फुटत नाही. परंतु कवटीच्या हाडांच्या क्षमता शक्तीला देखील मर्यादा आहे. कवटीच्या हाडांच्या कडकपणामुळे कवटीच्या हाडे तीव्र फटक्याची उर्जा शोषून घेतात. पण प्रहार फार जोराचा असला तर मात्र कवटीच्या हाडाला तडा जातो. तडा गेलेली कवटी मेंदूचे रक्षण करू शकत नाही आणि अशा परिस्थितीत मेंदूला अतिशय धोका असतो..
डिफ्यूज ॲग्झॉनल इंज्युरी (मज्जापेशीतील तंतूंची इजा) मध्ये मेंदूला दुखापत होते, पण त्यात रक्तस्त्राव होत नाही. मेंदूच्या पेशींचे नुकसान मात्र होते. मेंदूच्या पेशींच्या नुकसानामुळे त्या काम करण्यास सक्षम रहात नाहीत. यामुळे मेंदूला सूज येऊ शकते व जीवाला अधिक धोका निर्माण होऊ शकतो. मेंदूच्या दुखापतीच्या इतर प्रकारांप्रमाणे हा प्रकार बाह्यदृष्ट्या दिसत नसला तरी मेंदूला दुखापत होण्याचा सर्वाधिक धोकादायक प्रकार म्हणजे डिफ्यूज ॲग्झॉनल इंज्युरी होय. यामुळे मेंदूची कायमस्वरुपी हानी होऊ शकते आणि मृत्यू देखील होऊ शकतो.
आपल्या डोक्यात आपल्या शरीराच्या इतर भागांपेक्षा जास्त रक्तवाहिन्या असतात, म्हणूनच आपल्या मेंदूच्या पृष्ठभागावर किंवा आपल्या मेंदूत इजा झाली तर रक्तस्त्राव होतो आणि गंभीर चिंतेचा विषय असतो. मात्र, डोक्याच्या सर्व दुखापतींमुळे रक्तस्त्राव होत नाही. मेंदूच्या गंभीर दुखापतीची अनेक लक्षणं लगेच दिसून येत नाहीत परंतु ते पुढच्या काही दिवसांत उद्भवू शकतात. म्हणून डोक्याला दुखापत झालेल्या रूग्णाला थोडे दिवस वैद्यकिय निरीक्षणाखाली ठेवले पाहिजे.
डोक्याला गंभीर दुखापत झाल्यास बरीच लक्षणं आढळतात. ती आहेत:
डोक्याला झालेल्या प्रत्येक दुखापतीकडे त्वरित लक्ष देणे आणि काळजी घेणे आवश्यक आहे. डोक्याला झालेल्या कोणत्याच दुखापतीकडे दुर्लक्ष करू नये. तुम्ही किंवा तुमचे नातलग किंवा मित्रपरिवार यांना डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची लक्षणं दिसल्यास त्वरित वैद्यकीय (मेडिकल) मदत घ्यावी. डोक्याच्या दुखापतीवर घरी उपचार सुचवत नाही कारण यामुळे जीवघेणा TBI होऊ शकतो. खालील लक्षणांना आपत्कालीन उपचारांची (इमर्जन्सी ट्रीटमेंटची) आवश्यकता असते :
तुमच्या मोबाईल फोनवरून 108 वर कॉल करा आणि त्वरित पेशंटला इमर्जन्सी रूम असलेल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा. पेशंटची हालचाल झाल्यास मेंदूला किंवा मज्जारज्जूला दुखापत होऊन परिस्थिती आणखी बिघडू शकते, म्हणून पेशंटला कार किंवा ऑटोरिक्षामध्ये नेण्याऐवजी ॲम्ब्युलन्स मधूनच इमर्जन्सी रूम मध्ये घेऊन जा.
जखमी लोकांना अधिक दुखापत न होऊ देता काळजीपूर्वक हलवण्यासाठी ॲम्ब्युलन्स कर्मचार्यांना ट्रेनिंग दिलेले असते.
डोक्याला गंभीर दुखापत झाल्यास बरीच लक्षणं आढळतात. ती आहेत:
इमर्जन्सी रूममधील डॉक्टर ग्लासगो कोमा स्केल (GCS) च्या मदतीने डोक्याला झालेल्या दुखापतीचा अंदाज घेतात. GCS ही एक 15-गुणांची चाचणी असते जी रुग्णाच्या शारीरिक व मानसिक स्थितीचे मूल्यांकन करते. जास्त GCS स्कोअर कमी गंभीर दुखापत दर्शवतो, तर कमी GCS स्कोअर डोक्याला गंभीर दुखापत दर्शवतो.
काय घडले आणि दुखापत कशी झाली हे माहित असलेली एक व्यक्ति पेशंट सोबत असणे आवश्यक असते, कारण पेशंटला ॲक्सिडेंटचा तपशील आठवत नाही असे होऊ शकते. पेशंट बेशुद्ध अवस्थेत असल्यास तो केव्हापासून या अवस्थेत आहे हे डॉक्टरांना कळणे अतिशय महत्वाचे असते.
पेशंटच्या शरीरावर कुठे जखमा किंवा सूज आहे का बघण्यासाठी डोक्याला दुखापत झालेल्या पेशंटची संपूर्ण तपासणी केली जाते. रुग्णाचे स्नायूंवरील नियंत्रण आणि सामर्थ्य, डोळ्यांची हालचाल आणि संवेदना इत्यादींचे मोजमाप करून तुमच्या मज्जातंतूंच्या कार्याचे मूल्यांकन करण्यासाठी न्यूरोलॉजिकल तपासणी केली जाते.
डोके दुखापतींचे निदान करण्यासाठी सामान्यत: इमेजिंग टेस्ट्स वापरल्या जातात. CT स्कॅन फ्रॅक्चर, रक्तस्त्राव आणि गुठळ्या झाल्याचे पुरावे, मेंदूची सूज आणि इतर कोणत्याही स्ट्रक्चरल दुखापतींचे निदान करण्यात मदत करते. CT स्कॅन वेगवान आणि अचूक असते, म्हणूनच ही इमेजिंग टेस्ट सर्वप्रथम करण्यात येते. MRI स्कॅन मेंदूची अधिक सविस्तर माहिती देते, पण पेशंटची परिस्थिती स्थिर झाल्यानंतरच मगज MRI स्कॅन केले जाऊ शकते कारण MRI स्कॅन करायला अर्धा ते पाऊण तास लागतो.
डोक्याच्या दुखापतींचे उपचार त्याच्या प्रकारावर, जखमांवर आणि तीव्रतेवर अवलंबून असतात.
डोक्याला किरकोळ दुखापत झाल्यास दुखापतीच्या जागी दुखण्याशिवाय इतर कोणतेच लक्षणं दिसत नाहीत. अशा परिस्थितीत सौम्य वेदनाशामक औषधांनी वेदना बऱ्या होतात.
वेदना कमी करण्यासाठी अॅस्पिरिनचा वापर करू नये कारण यामुळे रक्तस्त्राव वाढू शकतो किंवा अधिक काळ होऊ शकतो.
टाळूवरील जखम झाली असल्यास ती शल्यचिकित्सा करून टाके घेऊन किंवा स्टेपल्सद्वारे जखम बंद करण्यात येते. मग जखमेला अँटिसेप्टिक्स, तलम, पातळ कापड आणि टेप किंवा बॅंडेजने झाकले जाते.
डोक्याला झालेली दुखापत किरकोळ वाटली तरीसुद्धा रूग्णाची प्रकृती ढासळणार नाही याची खात्री करुन घेण्यासाठी पेशंटची तपासणी केलीच पाहिजे. रूग्ण झोपलेला असल्यास साधारणतः दर दोन तासांनी त्याच्या जागरूकताची पातळी तपासण्यासाठी आणि काही नवीन लक्षण उद्भवले नसल्याची खात्री करण्यासाठी पेशंटला जागे केले पाहिजे.
डोक्याला गंभीर दुखापत झाल्यास हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करणे आवश्यक असते. हॉस्पिटलमध्ये निदान झाल्यावर मगच उपचार होऊ शकतात.
समर्थ न्यूरो आणि ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्येही (डॉ रवींद्र पाटील) डोक्याच्या दुखापतीवर उपचार उपलब्ध आहेत
मेंदूच्या गंभीर दुखापती झालेल्या रूग्णाला फेफरे /अपस्मार [फिट] येऊ नये म्हणून औषधं दिली जाऊ शकतात.
कवटीच्या आतील प्रेशर कमी करण्यासाठी, पेशंटला मूत्रविसर्जनासाठी औषधं [त्यांना डायुरेटिक्स म्हणतात] दिली जाऊ शकतात.
मेंदूचे अधिक नुकसान टाळण्यासाठी आपत्कालीन शस्त्रक्रिया (इमर्जन्सी सर्जरी) करणे आवश्यक असू शकते. खालील कारणांसाठी शस्त्रक्रिया (सर्जरी) केली जातेः
मेंदूला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे मेंदूचे कार्य पूर्वपदावर येण्यासाठी आणि मेंदूची कार्यक्षमता पुन्हा मिळवण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो
दीर्घकालीन परिणाम दुखापतीच्या तीव्रतेवर अवलंबून असतात. डोक्याला किरकोळ दुखापत झालेल्या बहुतेक लोकांवर चिरस्थायी (कायमस्वरूपी टिकणारे) परिणाम होत नाहीत. डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या लोकांच्या व्यक्तिमत्त्व, शारीरिक क्षमता आणि विचार करण्याची क्षमता यामध्ये कायमस्वरुपी बदल होऊ शकतात आणि रूग्ण व त्यांच्या कुटुंबियाना त्याचा सामना करावा लागू शकतो. बालपणी डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्यास त्याचे परिणाम दीर्घकालीन हानिकारक होऊ शकतात.
कॉन्ट्रास्ट सीटी स्कॅन मेंदूतील वेंट्रिकल्सचा आकार दर्शवू शकतो. एकतर रुग्णाच्या शिरामध्ये रेडिओपेक डाय इंजेक्ट केला जातो किंवा सी.एस.एफ. एवजी वेंट्रिकल्समधे हवा भरली जाते आणि नंतर मेंदूच्या वेंट्रिकल्सचे सीटी स्कॅन केले जाते. दोन्ही प्रकारे चांगला कॉन्ट्रास्ट दिसतो आणि व्हेंट्रिकल्सच्या आकाराची कल्पना केली जाऊ शकते. सी.टी. स्कॅन मध्ये रेडिओ ओपेक डाय पांढरा दिसतो तर हवा असलेली जागा काळी दिसते. त्यामुळे डॉक्टरांना वेंट्रिकल्सचा आकार पाहण्यास आणि ट्यूमर, वाढलेला सी.एस.एफ. दाब किंवा मेंदूच्या वेंट्रिक्युलर सिस्टीममध्ये अडथळा याविषयी निदान करण्यात मदत होते.
मिरजेतील समर्थ न्यूरो आणि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मुलांमधील हायड्रोसेफलस आणि सी.एस.एफ. अवरोधाच्या ब्लॉकेजच्या इतर कारणांवर उपचार करण्यासाठी सर्व पायाभूत सुविधा आणि कर्मचारी आहेत. मुख्य न्यूरो सर्जन डॉ. रवींद्र पाटील यांनी अनेक हायड्रोसिफॅलस असलेल्या अनेक मुलांवर शस्त्रक्रिया केल्या आहेत व ती मुले आज मोठी झाली आहे. या मुलांना शंट शस्त्रक्रियेची गरज होती. तसेच डॉ रवींद्र पाटील यांनी मेंदूतील गाठी असलेल्या प्रौढ रुग्णांवर देखील अनेक यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत.
समर्थ न्यूरो आणि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 100+ बेड आहेत आणि हे न्यूरोलॉजिकल समस्या / आजारावरील इमर्जन्सी सर्जरीमध्ये आणि निदानामध्ये तज्ञ आहे.