By Dr.Ravindra Patil
मेंदूची शस्त्रक्रिया करणे ही कोणाच्याही आयुष्यातील एक मोठी घटना असते. जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्याला मेंदूची शस्त्रक्रिया करावी लागली तर मेंदूच्या शस्त्रक्रियेबद्दल आणि मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर रूग्ण बरा कसा होतो हे जाणून घेणे उपयुक्त ठरेल.
मेंदूची शस्त्रक्रिया हा अत्यंत क्लेशकारक अनुभव असू शकतो आणि मेंदूच्या शस्त्रक्रियेतून बरे झालेल्या अनेक रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर नैराश्य, चक्कर येणे, गोंधळ आणि अशक्तपणाचा सामना करावा लागतो. कुटुंबातील सदस्य आणि मित्रांनी रुग्णाशी बोलणे आणि त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवणे खूपच गरजेचे असते.
मेंदूतील ट्यूमर, सेरेब्रल हॅमरेज, ट्रायजेमिनल न्युराल्जिया, एपिलेप्सी, पार्किन्सनिझम, हायड्रोसेफलस आणि इतर अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी मेंदूची शस्त्रक्रिया केली जाते. रुग्ण किंवा काळजी घेणाऱ्याच्या दृष्टिकोनातून ऑपरेशन नंतर खालील मुद्दे जाणून घेण्यासारखे आहेत.
मेंदूची शस्त्रक्रिया क्रॅनियोटॉमी किंवा बर-होल सर्जरीद्वारे केली जाऊ शकते. दोन्हीमध्ये, कवटीच्या त्वचेवर कापून सुरुवात करतात आणि सर्जरी झाल्यावर जखम बंद करण्यासाठी टाके घेतात किंवा स्टेपल्स लावतात. टाके किंवा स्टेपल एक आठवडा किंवा त्याहून अधिक वेळानंतर काढावे लागतात.
हायड्रोसेफलसमध्ये, सेरेब्रोस्पाइनल द्रवपदार्थ खूप जास्त असतो. त्याचा निकाल करायला मेंदूपासून उदरपोकळीत एक नळी शस्त्रक्रिये द्वारा ठेवली जाते, जेणेकरून जास्तीचा सेरेब्रोस्पाइनल द्रव मेदूपासून ओटीपोटात वाहून जाते.
क्रॅनियोटॉमीमध्ये जर कवटीचा काही भाग [हाडाची फ्लॅप म्हणतात] काढून टाकला, तर तो धुऊन, निर्जंतुक करून प्लास्टिकच्या पॅकिंगमध्ये बंद केला जातो आणि पॅकेजवर रुग्णाचे नाव लिहून सुरक्षित पणे ठेवला जातो. हाडांचा फ्लॅप काही महिन्यांनी परत कवटीला जोडली जाते. काही प्रकरणांमध्ये, हाडांचा फ्लॅप रुग्णाच्या पोटाच्या आत एक छोटे ऑपरेशन करून जतन केली जाते.
कोणत्याही जखमेप्रमाणे, मेंदूच्या शस्त्रक्रियेच्या जखमेवर योग्य काळजी न घेतल्यास संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे शस्त्रक्रियेपूर्वी टाळूचे केस मुंडले जातात. टाळू साबण आणि पाण्याने आणि नंतर विविध एंटीसेप्टिक द्रावणाने स्वच्छ केली जाते. शस्त्रक्रियेनंतर सर्जिकल जखम स्वच्छ केली जाते आणि निर्जंतुकीकरण केलेल्या ड्रेसिंगने आणि मलमपट्टीने झाकली जाते. अशा जखमेवरची पट्टी कधीही भिजू देऊ नका. सगळ्यात उत्तम, पट्टीला कधीही स्पर्श करू नका. डॉक्टर आणि परिचारिकांना शस्त्रक्रियेनंतर जखमेचे ड्रेसिंग करू द्या.
प्रत्येक शस्त्रक्रियेनंतर, अंतर्गत रक्तस्त्राव होण्याचा थोडासा धोका असतो. अंतर्गत रक्तस्रावामुळे कवटीच्या आत रक्त जमा झाले तर अनेक गुंतागुंती निर्माण होतात. रक्त जमा न व्हावे म्हणून जखमेमध्ये किंवा जखमेपासून दूर असलेल्या छोट्या छिद्रात ड्रेन ट्यूब ठेवली जाऊ शकते. या मार्गाने जमा झालेले रक्त किंवा द्रव जखमेच्या बाहेर निघून येते.
परंतु जर तुमच्या जखमेतून रक्तस्त्राव होत असेल तर ताबडतोब रुग्णालयात जाणे चांगले.
मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर, रुग्णाचे शरीर साबणाच्या पाण्याने पुसले जाऊ शकते. आंघोळ करणे देखील सुरक्षित आहे, तथापि, रुग्णाला चक्कर येऊ शकते आणि म्हणून रुग्णाला अंथरुणावर ठेवणेच चांगले. डोक्यावरची पट्टी किंवा ड्रेसिंग कधीही ओले होऊ नये हे सुज्ञास सांगण्याची गरज नाही.
संसर्ग टाळण्यासाठी प्रतिजैविकांचा (एन्टीबायोटीक्सचा) कोर्स, वेदना कमी करण्यासाठी पेन किलर, अॅसिडिटी कमी करण्यासाठी औषधे इत्यादी लिहून दिली जातात. ही नियमितपणे घेतली पाहिजेत. एक डोस चुकल्याने मोठी समस्या निर्माण होत नाही, परंतु औषधे अजिबात न घेणे हे करू नये.
या औषधांव्यतिरिक्त, रुग्णाने शस्त्रक्रियेपूर्वी जी काही औषधे घेतली ती देखील घेतली पाहिजेत. ही औषधे म्हणजे उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा अशा कोणत्याही दीर्घ स्थितीसाठी असू शकतात.
मेंदूवर शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांबद्दल तुम्ही वरील गोष्टी ऐकल्या असतील. हे काही बाबतीत खरे असु शकते. मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर स्मरणशक्ती किंवा हालचाल किंवा बोलणे यात फरक वगैरे काही गोष्टींसाठी तयार रहा. अशा रूग्णांमध्ये काही प्रकारचे तात्पुरते मानसिक बदल का होतात हे डॉक्टरांना अजूनही समजलेले नाहीत. असले फरक हे औषधोपचार, आजार आणि शस्त्रक्रियेनंतर उद्भवतात.
मेंदूच्या शस्त्रक्रिया किंवा आजारानंतर मेंदूतील अत्यंत सामान्य आणि कमी समजल्या जाणाऱ्या बदलांमध्ये- मनाचा गोंधळ होणे आणि भ्रम यांचा समावेश होतो. हे बहुतेक वेळा तात्पुरते असते, परंतु हे काही तास, दिवस, आठवडे किंवा महिनेही टिकू शकते. परंतु, अधिक गंभीर समस्या त्या असतात की ज्या संज्ञानात्मक समस्या विकसित करतात आणि त्या समस्या कधीही होत नाहीत. हे अगदी सूक्ष्म असू शकते, परंतु त्यामुळे जीवन बदलू शकते. यामध्ये स्मरणशक्ती कमी होणे आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता नसणे यांचा समावेश होतो, जो वर्षानुवर्षे टिकू शकतो किंवा कायमचा असू शकतो.
चांगली बातमी अशी आहे की अशा गोष्टी क्वचितच घडतात. न्यूरोसर्जन शस्त्रक्रियेपूर्वी रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना शस्त्रक्रियेचे धोके आणि फायदे पूर्णपणे समजावून सांगतील. शस्त्रक्रिया करणार्या रूग्णाला शल्यक्रिया उपचाराचे फायदे मिळविण्यासाठी जोखमीची शक्यता स्वीकारावी लागते. हे लक्षात घ्यायला हवे की ज्या लोकांना शस्त्रक्रियेची गरज असते ते आजारी असतात आणि त्याचा मेंदूवर परिणाम होतो. त्या आजारपणामुळे मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर कोणत्याही संज्ञानात्मक किंवा मोटर कमतरता होऊ शकते आणि त्या साठी शस्त्रक्रियेला दोष देणे योग्य नाही.
शस्त्रक्रियेदरम्यान ऍनेस्थेसियाचा मेंदूवर परिणाम होतो का? शस्त्रक्रियेच्या शारीरिक आघाताचे काय? शस्त्रक्रियेमुळे मूत्रपिंडांवर परिणाम होतो. जर एखाद्या शस्त्रक्रियेमुळे इतर अवयवांचे नुकसान होऊ शकते, तर ते मेंदूला देखील नुकसान पोहोचवू शकते. हे शरीराच्या विस्तृत दाहासारखे आहे. वृद्धांमध्ये, मेंदूची शस्त्रक्रिया मेंदूवर परिणाम करू शकते.
मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर मेंदूला बरे होण्यासाठी अंदाजे 12-18 महिने लागतात आणि हळूहळू रुग्णाला त्याची सर्व सामान्य कार्ये परत करण्याची क्षमता येईल आणि रूग्ण त्याची दैनंदिन कामे पुन्हा करू शकेल. तथापि, त्या वेळी रूग्णाला त्यांच्या कुटुंबीयांच्या संपूर्ण समर्थनाची आणि समजुतदार पणाची आवश्यकता असते, तसेच थेरपिस्टच्या मदतीची आवश्यकता असू शकते. यामुळे रुग्णाला त्यांचे स्वातंत्र्य व त्यांच्या क्षमतेवर आत्मविश्वास परत मिळण्यास मदत होईल.
मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर, एखादी व्यक्ती विचलित होऊ शकते आणि काही काळासाठी बोलणे किंवा समजणे कमी होऊ शकते. कौटुंबिक सदस्यांना आणि मित्रांना रुग्णाशी बोलताना दोन शब्द अथवा वाक्यांमध्ये थोडा विराम द्यावा, जेणेकरून रूग्णाला संभाषण सहज समजू शकेल. मुद्दम हळू हळू बोलू नका, कारण रुग्ण ते ओळखू शकतात आणि त्यांना भावनिक उद्रेक किंवा दुखापत होऊ शकते.
मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर लवकरच आणि सहा महिन्यांनंतर, आणि एक वर्षानंतर, रुग्णाला न्यूरॉलॉजिस्टकडे आणि आवश्यक असल्यास मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जावे. हेतु हा की रूग्ण बरा होत आहे की नाही हे पाहण्यासाठी. राग, अनियंत्रित हसणे, अलिप्तपणा आणि नैराश्य यासारख्या भावनिक उद्रेकांकडे लक्ष दिले पाहिजे. अशी लक्षणे आढळल्यास, रुग्णाला वैद्यकीय विशेज्ञांकडे तपासणीसाठी घेऊन जाणे गरजेचे असते.
समर्थ न्यूरो आणि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 100+ बेड आहेत आणि हे न्यूरोलॉजिकल समस्या / आजारावरील इमर्जन्सी सर्जरीमध्ये आणि निदानामध्ये तज्ञ आहे.