पार्किन्सन रोग – 2
Dr. Ravindra Patil
on
एप्रिल 12, 2022

पार्किन्सन रोग – 2
गेल्या लेखात आपण पार्किन्सन रोगाची माहिती घेतली. पार्किन्सन रोग एक सतत वाढत जाणारा मज्जासंस्थेचा रोग आहे. यात शरीर व हात सतत थरथरतात व हालचाल, अभिव्यक्ती आणि वेग इत्यादींवर परिणाम होतो.
या भागात त्या साठी शस्त्रक्रियेचा उपचार आणि पार्किन्सन्स आजारासह जगण्याविषयी माहिती देत आहोत.
Table of Contents
सर्जिकल उपचार
पार्किन्सन रोगासाठी शस्त्रक्रिया म्हणजे ‘डीप ब्रेन स्टिम्युलेशन’ [DBS]. यात सर्जन मेंदूमध्ये इलेक्ट्रोड इम्प्लांट करतात. इलेक्ट्रोड्सची दुसरी टोके कॉलरबोनजवळ रुग्णाच्या छातीत बसवलेल्या जनरेटरशी जोडलेली असतात. यामुळे पार्किन्सन रोगाची लक्षणे कमी होऊ शकतात.
DBS लेव्होडोपावरील अनियंत्रित आणि चढ–उतार प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा औषधांच्या समायोजनाने सुधारत नसलेल्या डिस्कायनेसियावर नियंत्रण ऑपरेशन उपयोगी असते.
डीबीएस पार्किन्सन रोग जास्त वाढलेल्या रुग्णांना केले जाते, विशेष करून ज्यांना लेवोडोपा या औषधाचा परिणाम अस्थिर होतो. डीबीएस औषधोपचारातील चढउतार स्थिर करू शकते, डिस्कायनेसिया, थरथर, स्यायुंचा कडकपणा आणि हालचाली कमी करू शकते. DBS सर्जरीचे धोके म्हणजे संसर्ग, सेरेब्रोव्हस्कुलर स्ट्रोक किंवा ब्रेन हॅमरेज आहेत पण ते क्वचित होतात.
जीवनशैलीतील बदल आणि घरगुती उपचार
पार्किन्सन रोगात कोणतेही अन्न किंवा पदार्थांचे मिश्रण मदत करते असे सिद्ध झाले नसले तरी काही खाद्यपदार्थ लक्षणे कमी करण्यास मदत करू शकतात. पार्किन्सन रोगासाठी घरगुती उपचारांमध्ये समाविष्ट आहे, जास्त फायबर असलेले अन्न खाणे आणि पुरेशा प्रमाणात पाणी पिणे हे नक्कीच फायदा करते आणि पार्किन्सन्स रोगामध्ये अनेक लोकांना होत असलेली बद्धकोष्ठता (मलावरोध) टाळण्यास मदत करू शकते. जर उत्तम संतुलित आहारा घेतला तर त्या मुळे ओमेगा–३ फॅटी अॅसिडही मिळते, जे पार्किन्सन रोगाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.
व्यायाम
व्यायामामुळे रुग्णाच्या स्नायूंची ताकद, लवचिकता आणि संतुलन वाढू शकते. हे निरोगीपणाची भावना सुधारण्यास आणि नैराश्य कमी करण्यास देखील मदत करते. सर्वोत्तम व्यायाम म्हणजे चालणे, पोहणे, बागकाम, नृत्य, वॉटर एरोबिक्स किंवा स्ट्रेचिंग.
पार्किन्सन रोगामुळे संतुलन बिघडू शकते, ज्यामुळे सामान्य चालणे कठीण होते. व्यायामामुळे चाल सुधारू शकते. रुग्णांनी खालील विशेष सूचना लक्षात ठेवाव्या:
एकदम अचानक हालचाल करू नका
जेव्हा तुम्ही चालत असाल तेव्हा तुमची टाच प्रथम जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा. चुळबूळ टाळा, ताठ चाला, चालताना समोर पहा, जमिनीकडे पाहून चालू नका.
खाली पडणे टाळा
पार्किन्सन्सच्या नंतरच्या टप्प्यातील रुग्ण अधिक सहजपणे पडू शकतात. पडणे टाळण्यासाठी, हे करा:
- चालताना, तुमच्या पायावर तुमचे शरीर फिरवण्याऐवजी चालता चालता यू–टर्न घ्या.
- तुमचे वजन दोन्ही पायांमध्ये समान रीतीने वितरित करा, आणि झुकू नका किंवा वाकू नका.
- चालताना वस्तू घेऊन चालणे टाळा.
- मागे फिरणे टाळा.
दैनंदिन जीवनातील क्रियाकलाप
दैनंदिन जीवनातील क्रियाकलाप – जसे की कपडे घालणे, खाणे, आंघोळ करणे आणि लिहिणे – पार्किन्सन रोग असलेल्या लोकांसाठी कठीण असू शकते. व्यावसायिक थेरपिस्ट यात मदत करू शकतात.
पार्किन्सनसाठी पर्यायी औषध
सहाय्यक उपचारांमुळे पार्किन्सन रोगाची काही लक्षणे आणि कॉम्प्लिकेशन्स कमी होण्यास मदत होते. वेदना, थकवा आणि नैराश्य वगैरे लक्षणे वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक उपचार बरोबर घेतल्यास अधीक फायदा होतो.
- मसाज केल्याने स्नायूंचा ताण कमी होतो आणि आराम मिळू शकतो.
- ताई–ची हा चिनी व्यायामाचा एक प्राचीन प्रकार आहे. हे मंद, वाहत्या हालचालींचा वापर करते ज्यामुळे लवचिकता, संतुलन आणि स्नायूंची ताकद सुधारू शकते आणि पडणे टाळण्यास मदत होऊ शकते.
- हळुवार स्ट्रेचिंग हालचाली आणि योगासने करून लवचिकता आणि संतुलन वाढू शकते.
- ध्यान, ज्यामध्ये रुग्ण त्याचे/तिचे मन एखाद्या कल्पना किंवा प्रतिमेवर केंद्रित करतो, असे ध्यान केल्याने तणाव आणि वेदना कमी होऊ शकतात आणि रूग्णाचे आरोग्य सुधारू शकते.
- रूग्णाने एखादा पाळीव कुत्रा किंवा एखादे पाळीव मांजर ठेवल्यास लवचिकता आणि हालचाल वाढू शकते आणि भावनिक आरोग्य सुधारू शकते.
पार्किन्सन रोगाच्या समस्यांचा सामना करणे
रुग्णांना कधीकधी राग येणे किंवा अति निराश होणे सामान्य आहे, कारण चालणे, बोलणे आणि खाणे अशा सामान्य गोष्टी देखील कठीण होतात आणि जास्त वेळ घेतात.
उदासीनते साठी अँटीडिप्रेसंट औषधे लक्षणे कमी करण्यास मदत करतात.
कुटुंब आणि मित्र हे रुग्णांसाठी सर्वोत्तम समर्थन गट आहेत. सपोर्ट ग्रुप रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना अशाच परिस्थितीतून जात असलेल्या लोकांना शोधण्यासाठी मदत देतात आणि त्यामुळे रूग्णाला खूप मदत होते. दीर्घकालीन पार्किन्सन रोग असलेल्या लोकांसोबत काम करण्यासाठी प्रशिक्षित मानसशास्त्रज्ञ किंवा सामाजिक कार्यकर्ते उपलब्ध असल्यास खूप मदत होते.
डॉक्टरच्या भेटीची तयारी
विचारण्यासारखे बरेच काही असल्यामुळे डॉक्टरना भेटण्याआधी भेटीची तयारी करणे अति आवश्यक आहे.
- तुम्ही ज्या कारणासाठी अपॉइंटमेंट घेतली आहे त्या कारणांशिवाय इतर लक्षणे तुम्हाला जाणवत असल्यास त्याविषयी विचारण्याचे प्रश्न लिहा.
- मुख्य वैयक्तिक माहिती लिहा. कोणतेही मोठे ताण किंवा अलीकडील जीवनातील बदलांविषयी लिहा.
- तुम्ही घेत असलेल्या सर्व औषधे, जीवनसत्त्वे आणि पूरक आहारांची यादी तयार ठेवा.
- कुटुंबातील एखादा सदस्य किंवा मित्र रुग्णासोबत असावा. काहीवेळा रुग्णाला सल्लामसलत दरम्यान डॉक्टरांनी दिलेली सर्व माहिती लक्षात ठेवणे कठीण होऊ शकते. जर कोणी सोबत असेल, तर ती व्यक्ति सल्ला लक्षात ठेवु शकते.
- तुमच्या डॉक्टरांना विचारण्यासाठी प्रश्न लिहा, कारण तुमच्या डॉक्टरांशी तुमचा वेळ मर्यादित असतो.
- पार्किन्सन आजाराच्या रुग्णांसाठी काही महत्त्वाचे प्रश्न आहेत:
- माझ्या लक्षणांचे सर्वात संभाव्य कारण काय आहे?
- इतर संभाव्य कारणे आहेत का?
- मला कोणत्या प्रकारच्या चाचण्यांची आवश्यकता आहे? या चाचण्यांसाठी काही विशेष तयारी आवश्यक आहे का?
- पार्किन्सन्सचा आजार सहसा कसा वाढतो?
- मला जीवनाच्या अखेरीस सतत मदत लागेल का?
- कोणते उपचार उपलब्ध आहेत आणि तुम्ही माझ्यासाठी कोणते उपचार सुचवत आहात?
- उपचारांपासून कोणत्या प्रकारचे साइड इफेक्ट्सची होऊ शकतात?
- उपचार काम करत नसल्यास किंवा काम करणे थांबवल्यास, माझ्याकडे अतिरिक्त पर्याय आहेत का?
- माझ्या आरोग्याच्या इतरही समस्या आहेत. मी या परिस्थिती एकत्रितपणे कसे काय व्यवस्थान करू?
- घरी नेण्यासाठी आपण काही ब्रोशर किंवा माहिती पत्रक देऊ शकता का?
- माझ्या रोगाची कोणत्या वेबसाइटमध्ये चांगली आणि सुबक माहिती मिळेल?
तुमच्या डॉक्टरांना विचारण्यासाठी तुम्ही तयार केलेल्या प्रश्नांव्यतिरिक्त, तुमच्या भेटीदरम्यान तुमच्या मनात येणारे प्रश्न विचारण्यास अजिबात संकोच करू नका.
आपल्या डॉक्टरांकडून काय अपेक्षा करावी
तुमचे डॉक्टर तुम्हाला अनेक प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. त्यांना उत्तर देण्यास तयार रहा. तुमचे डॉक्टर खालील प्रश्न विचारू शकतात:
- तुम्हाला पहिल्यांदा लक्षणे कधी जाणवू लागली?
- तुम्हाला नेहमीच लक्षणे असतात का ती येतात आणि जातात?
- तुमच्या लक्षणांमध्ये कधी काही सुधारणा झाल्याचे दिसते का?
- कोणत्याही गोष्टीमुळे तुमची लक्षणे आणखी वाईट होतात असे तुम्हाल वाटते का?
सारांश
पार्किन्सन रोगाची कोणतीही पूर्णपणे ज्ञात कारणे नाहीत आणि सध्या कोणताही इलाज नाही. नवीन संशोधन रुग्णांना नक्कीच काही मदत करेल.
परंतु पार्किन्सन रोगात सर्व काही उदास नसते. औषधे, व्यायाम आणि व्यावसायिक थेरपी लक्षणे मोठ्या प्रमाणात कमी करतात, जीवनाची गुणवत्ता सुधारतात आणि आयुर्मान वाढवतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, लोकं आणि त्यांचे कुटुंबिय पार्किन्सन आजारासोबत जगायला शिकतात.