पार्किन्सन रोग – 2

पार्किन्सन रोग/Parkinson's Disease

गेल्या लेखात आपण पार्किन्सन रोगाची माहिती घेतली. पार्किन्सन रोग एक सतत वाढत जाणारा मज्जासंस्थेचा रोग आहे. यात शरीर व हात सतत थरथरतात व हालचाल, अभिव्यक्ती आणि वेग इत्यादींवर परिणाम होतो.

या भागात त्या साठी शस्त्रक्रियेचा उपचार आणि पार्किन्सन्स आजारासह जगण्याविषयी माहिती देत आहोत.

Table of Contents

सर्जिकल उपचार

पार्किन्सन रोगासाठी शस्त्रक्रिया म्हणजे ‘डीप ब्रेन स्टिम्युलेशन’ [DBS]. यात सर्जन मेंदूमध्ये इलेक्ट्रोड इम्प्लांट करतात. इलेक्ट्रोड्सची दुसरी टोके कॉलरबोनजवळ रुग्णाच्या छातीत बसवलेल्या जनरेटरशी जोडलेली असतात. यामुळे पार्किन्सन रोगाची लक्षणे कमी होऊ शकतात.

DBS लेव्होडोपावरील अनियंत्रित आणि चढ-उतार प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा औषधांच्या समायोजनाने सुधारत नसलेल्या डिस्कायनेसियावर नियंत्रण ऑपरेशन उपयोगी असते.

डीबीएस पार्किन्सन रोग जास्त वाढलेल्या रुग्णांना केले जाते, विशेष करून ज्यांना लेवोडोपा या औषधाचा परिणाम अस्थिर होतो. डीबीएस औषधोपचारातील चढउतार स्थिर करू शकते, डिस्कायनेसिया, थरथर, स्यायुंचा कडकपणा आणि हालचाली कमी करू शकते. DBS सर्जरीचे धोके म्हणजे संसर्ग, सेरेब्रोव्हस्कुलर स्ट्रोक किंवा ब्रेन हॅमरेज आहेत पण ते क्वचित होतात.

जीवनशैलीतील बदल आणि घरगुती उपचार

पार्किन्सन रोगात कोणतेही अन्न किंवा पदार्थांचे मिश्रण मदत करते असे सिद्ध झाले नसले तरी काही खाद्यपदार्थ लक्षणे कमी करण्यास मदत करू शकतात. पार्किन्सन रोगासाठी घरगुती उपचारांमध्ये समाविष्ट आहे, जास्त फायबर असलेले अन्न खाणे आणि पुरेशा प्रमाणात पाणी पिणे हे नक्कीच फायदा करते आणि पार्किन्सन्स रोगामध्ये अनेक लोकांना होत असलेली बद्धकोष्ठता (मलावरोध) टाळण्यास मदत करू शकते. जर उत्तम संतुलित आहारा घेतला तर त्या मुळे ओमेगा-३ फॅटी अॅसिडही मिळते, जे पार्किन्सन रोगाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.

व्यायाम

व्यायामामुळे रुग्णाच्या स्नायूंची ताकद, लवचिकता आणि संतुलन वाढू शकते. हे निरोगीपणाची भावना सुधारण्यास आणि नैराश्य कमी करण्यास देखील मदत करते. सर्वोत्तम व्यायाम म्हणजे चालणे, पोहणे, बागकाम, नृत्य, वॉटर एरोबिक्स किंवा स्ट्रेचिंग.

पार्किन्सन रोगामुळे संतुलन बिघडू शकते, ज्यामुळे सामान्य चालणे कठीण होते. व्यायामामुळे चाल सुधारू शकते. रुग्णांनी खालील विशेष सूचना लक्षात ठेवाव्या:

एकदम अचानक हालचाल करू नका

जेव्हा तुम्ही चालत असाल तेव्हा तुमची टाच प्रथम जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा. चुळबूळ टाळा, ताठ चाला, चालताना समोर पहा, जमिनीकडे पाहून चालू नका.

खाली पडणे टाळा

पार्किन्सन्सच्या नंतरच्या टप्प्यातील रुग्ण अधिक सहजपणे पडू शकतात. पडणे टाळण्यासाठी, हे करा:

  • चालताना, तुमच्या पायावर तुमचे शरीर फिरवण्याऐवजी चालता चालता यू-टर्न घ्या.
  • तुमचे वजन दोन्ही पायांमध्ये समान रीतीने वितरित करा, आणि झुकू नका किंवा वाकू नका.
  • चालताना वस्तू घेऊन चालणे टाळा.
  • मागे फिरणे टाळा.

दैनंदिन जीवनातील क्रियाकलाप

दैनंदिन जीवनातील क्रियाकलाप – जसे की कपडे घालणे, खाणे, आंघोळ करणे आणि लिहिणे – पार्किन्सन रोग असलेल्या लोकांसाठी कठीण असू शकते. व्यावसायिक थेरपिस्ट यात मदत करू शकतात.

पार्किन्सनसाठी पर्यायी औषध

सहाय्यक उपचारांमुळे पार्किन्सन रोगाची काही लक्षणे आणि कॉम्प्लिकेशन्स कमी होण्यास मदत होते. वेदना, थकवा आणि नैराश्य वगैरे लक्षणे वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक उपचार बरोबर घेतल्यास अधीक फायदा होतो.

  1. मसाज केल्याने स्नायूंचा ताण कमी होतो आणि आराम मिळू शकतो.
  2. ताई-ची हा चिनी व्यायामाचा एक प्राचीन प्रकार आहे. हे मंद, वाहत्या हालचालींचा वापर करते ज्यामुळे लवचिकता, संतुलन आणि स्नायूंची ताकद सुधारू शकते आणि पडणे टाळण्यास मदत होऊ शकते.
  3. हळुवार स्ट्रेचिंग हालचाली आणि योगासने करून लवचिकता आणि संतुलन वाढू शकते.
  4. ध्यान, ज्यामध्ये रुग्ण त्याचे/तिचे मन एखाद्या कल्पना किंवा प्रतिमेवर केंद्रित करतो, असे ध्यान केल्याने तणाव आणि वेदना कमी होऊ शकतात आणि रूग्णाचे आरोग्य सुधारू शकते.
  5. रूग्णाने एखादा पाळीव कुत्रा किंवा एखादे पाळीव मांजर ठेवल्यास लवचिकता आणि हालचाल वाढू शकते आणि भावनिक आरोग्य सुधारू शकते.

पार्किन्सन रोगाच्या समस्यांचा सामना करणे

रुग्णांना कधीकधी राग येणे किंवा अति निराश होणे सामान्य आहे, कारण चालणे, बोलणे आणि खाणे अशा सामान्य गोष्टी देखील कठीण होतात आणि जास्त वेळ घेतात.

उदासीनते साठी अँटीडिप्रेसंट औषधे लक्षणे कमी करण्यास मदत करतात.

कुटुंब आणि मित्र हे रुग्णांसाठी सर्वोत्तम समर्थन गट आहेत. सपोर्ट ग्रुप रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना अशाच परिस्थितीतून जात असलेल्या लोकांना शोधण्यासाठी मदत देतात आणि त्यामुळे रूग्णाला खूप मदत होते. दीर्घकालीन पार्किन्सन रोग असलेल्या लोकांसोबत काम करण्यासाठी प्रशिक्षित मानसशास्त्रज्ञ किंवा सामाजिक कार्यकर्ते उपलब्ध असल्यास खूप मदत होते.

डॉक्टरच्या भेटीची तयारी

विचारण्यासारखे बरेच काही असल्यामुळे डॉक्टरना भेटण्याआधी भेटीची तयारी करणे अति आवश्यक आहे.

  1. तुम्ही ज्या कारणासाठी अपॉइंटमेंट घेतली आहे त्या कारणांशिवाय इतर लक्षणे तुम्हाला जाणवत असल्यास त्याविषयी विचारण्याचे प्रश्न लिहा.
  2. मुख्य वैयक्तिक माहिती लिहा. कोणतेही मोठे ताण किंवा अलीकडील जीवनातील बदलांविषयी लिहा.
  3. तुम्ही घेत असलेल्या सर्व औषधे, जीवनसत्त्वे आणि पूरक आहारांची यादी तयार ठेवा.
  4. कुटुंबातील एखादा सदस्य किंवा मित्र रुग्णासोबत असावा. काहीवेळा रुग्णाला सल्लामसलत दरम्यान डॉक्टरांनी दिलेली सर्व माहिती लक्षात ठेवणे कठीण होऊ शकते. जर कोणी सोबत असेल, तर ती व्यक्ति सल्ला लक्षात ठेवु शकते.
  5. तुमच्या डॉक्टरांना विचारण्यासाठी प्रश्न लिहा, कारण तुमच्या डॉक्टरांशी तुमचा वेळ मर्यादित असतो.
  6. पार्किन्सन आजाराच्या रुग्णांसाठी काही महत्त्वाचे प्रश्न आहेत:
    • माझ्या लक्षणांचे सर्वात संभाव्य कारण काय आहे?
    • इतर संभाव्य कारणे आहेत का?
    • मला कोणत्या प्रकारच्या चाचण्यांची आवश्यकता आहे? या चाचण्यांसाठी काही विशेष तयारी आवश्यक आहे का?
    • पार्किन्सन्सचा आजार सहसा कसा वाढतो?
    • मला जीवनाच्या अखेरीस सतत मदत लागेल का?
    • कोणते उपचार उपलब्ध आहेत आणि तुम्ही माझ्यासाठी कोणते उपचार सुचवत आहात?
    • उपचारांपासून कोणत्या प्रकारचे साइड इफेक्ट्सची होऊ शकतात?
    • उपचार काम करत नसल्यास किंवा काम करणे थांबवल्यास, माझ्याकडे अतिरिक्त पर्याय आहेत का?
    • माझ्या आरोग्याच्या इतरही समस्या आहेत. मी या परिस्थिती एकत्रितपणे कसे काय व्यवस्थान करू?
    • घरी नेण्यासाठी आपण काही ब्रोशर किंवा माहिती पत्रक देऊ शकता का?
    • माझ्या रोगाची कोणत्या वेबसाइटमध्ये चांगली आणि सुबक माहिती मिळेल?

तुमच्या डॉक्टरांना विचारण्यासाठी तुम्ही तयार केलेल्या प्रश्नांव्यतिरिक्त, तुमच्या भेटीदरम्यान तुमच्या मनात येणारे प्रश्न विचारण्यास अजिबात संकोच करू नका.

आपल्या डॉक्टरांकडून काय अपेक्षा करावी

तुमचे डॉक्टर तुम्हाला अनेक प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. त्यांना उत्तर देण्यास तयार रहा. तुमचे डॉक्टर खालील प्रश्न विचारू शकतात:

  1. तुम्हाला पहिल्यांदा लक्षणे कधी जाणवू लागली?
  2. तुम्हाला नेहमीच लक्षणे असतात का ती येतात आणि जातात?
  3. तुमच्या लक्षणांमध्ये कधी काही सुधारणा झाल्याचे दिसते का?
  4. कोणत्याही गोष्टीमुळे तुमची लक्षणे आणखी वाईट होतात असे तुम्हाल वाटते का?

सारांश

पार्किन्सन रोगाची कोणतीही पूर्णपणे ज्ञात कारणे नाहीत आणि सध्या कोणताही इलाज नाही. नवीन संशोधन रुग्णांना नक्कीच काही मदत करेल.

परंतु पार्किन्सन रोगात सर्व काही उदास नसते. औषधे, व्यायाम आणि व्यावसायिक थेरपी लक्षणे मोठ्या प्रमाणात कमी करतात, जीवनाची गुणवत्ता सुधारतात आणि आयुर्मान वाढवतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, लोकं आणि त्यांचे कुटुंबिय पार्किन्सन आजारासोबत जगायला शिकतात.

Parkinson’s Disease – 2

पार्किन्सन रोग/Parkinson's Disease

We discussed Parkinson’s disease, which is is a progressive nervous system disease that affects movement, expression, speed and so on. 

In the second part, we discuss surgical treatment and living with Parkinson’s disease. 

Table of Contents

Surgical procedures

Surgery for Parkinson’s disease is Deep Brain Stimulation’ [DBS]. Surgeons implant electrodes in the brain. The other ends of the electrodes are connected to a generator implanted in the patient’s chest near the collarbone. It may reduce symptoms of Parkinson’s disease.

DBS is effective in controlling erratic and fluctuating responses to levodopa or for controlling dyskinesia that doesn’t improve with medication adjustments.

DBS is offered to patients with advanced Parkinson’s disease, who have unstable Levodopa responses. It can stabilize medication fluctuations, reduce dyskinesia, tremor, rigidity and slowing of movements. Risks of DBS are infection, Cerebrovascular Stroke or brain haemorrhage. 

Lifestyle Changes & Home Remedies

While no food or combination of foods has been proved to help in Parkinson’s disease, some foods may help ease symptoms. Eating foods high in fiber and drinking an adequate amount of fluids can help prevent constipation which is common in Parkinson’s disease. A balanced diet also provides omega-3 fatty acids, which are beneficial for Parkinson’s disease patients.

Exercise

Exercise may increase patient’s muscle strength, flexibility and balance. It also helps improve the sense of well-being and reduces depression. Best exercises are walking, swimming, gardening, dancing, water aerobics, or stretching.

Parkinson’s disease can disturb the sense of balance, making a normal gait difficult. Exercise may improve gait. These are special suggestions for patients:

Try not to move too quickly

Aim for your heel to strike the floor first when you’re walking. Avoid shuffling, walk erect, and look in front, not at the ground, while walking.

Avoid falling down

Patients in the later stages of Parkinson’s fall more easily. To prevent falls, do this:

  • While walking, take a U-turn instead of pivoting your body over your feet.
  • Distribute your weight evenly between both feet, and don’t lean or stoop.
  • Avoid carrying things while you walk.
  • Avoid walking backward.

Daily living activities

Daily living activities — such as dressing, eating, bathing, and writing — can be difficult for people with Parkinson’s disease. An occupational therapist can help.

Alternative medicine

Supportive therapies can help ease some of the symptoms and complications of Parkinson’s disease, such as pain, fatigue and depression when performed in combination with medical treatment.

  • Massage can reduce muscle tension and promote relaxation. 
  • Tai chi is an ancient form of Chinese exercise. It employs slow, flowing motions that may improve flexibility, balance, and muscle strength and may help prevent falls. 
  • Yoga through gentle stretching movements and poses may increase flexibility and balance. 
  • Meditation, in which the patient quietly reflects and focuses his/her mind on an idea or image. Meditation may reduce stress and pain and improve your sense of well-being. 
  • Having a pet dog or a pet cat may increase your flexibility and movement and improve your emotional health.

Coping with Parkinson’s disease Problems

It’s normal for patients to feel angry, depressed or discouraged at times, as walking, talking and even eating become more difficult and time-consuming.

Depression is common but antidepressant medications help ease the symptoms of depression.

Family and friends are the best support group for patients. Support groups offer a place for patients and their families to find people who are going through similar situations and that helps greatly. Psychologists or social workers trained in working with people who have chronic conditions are also helpful, if available.

Preparing for the specialist’s appointment

Because there’s often a lot to discuss, it’s a good idea to prepare for your appointment. 

  1. Write down any symptoms you’re experiencing, including any that may seem unrelated to the reason for which you scheduled the appointment. 
  2. Write down key personal information, including any major stresses or recent life changes.
  3. Make a list of all medications, vitamins and supplements that you’re taking. 
  4. A family member or friend should accompany the patient, if possible. https://kmcentr.com.ua Sometimes it can be difficult for the patient to remember all the information provided by the doctor during the consultation. If someone accompanies you, he/she may remember the advice. 
  5. Write down questions to ask your doctor, because your time with your doctor is limited. 
  6. Some important questions for Parkinson’s disease patients are: 
    • What’s the most likely cause of my symptoms? 
    • Are there other possible causes? 
    • What kinds of tests do I need? Do these tests require any special preparation? 
    • How does Parkinson’s disease usually progress? 
    • Will I eventually need long-term care? 
    • What treatments are available, and which do you recommend for me? 
    • What types of side effects can I expect from treatment? 
    • If the treatment doesn’t work or stops working, do I have additional options? 
    • I have other health conditions. How can I best manage these conditions together? 
    • Are there any brochures or other printed material that I can take home with me? 
    • What websites do you recommend?

In addition to the questions that you’ve prepared to ask your doctor, don’t hesitate to ask questions that occur to you during your appointment.

What to expect from your doctor

Your doctor is likely to ask you a number of questions. Be ready to answer them. Your doctor may ask:

  1. When did you first begin experiencing symptoms?
  2. Do you have symptoms all the time or do they come and go?
  3. Does anything seem to improve your symptoms?
  4. Does anything seem to make your symptoms worse?

To Summarise…

Parkinson’s disease has no perfectly known causes and no cure at present. New research will surely bring some help to patients. 

But everything is not gloomy with Parkinson’s disease. Medicines, exercise, and occupational therapy ease symptoms hugely, improve quality of life, and increase the life span. And most importantly, people learn to live with Parkinson’s disease. 

पार्किन्सन रोग – 1

पार्किन्सन/what is Parkinson's disease? - Samarth

आढावा

पार्किन्सन हा एक सतत वाढत जाणारा (प्रगतीशील) मज्जासंस्थेचा आजार आहे. यात हालचाल, अभिव्यक्ती, वेग इत्यादींवर परिणाम होतो. लक्षणे हळूहळू सुरू होतात आणि हळूहळू वाढतात.

पार्किन्सन रोग बरा होऊ शकत नसला तरी औषधे लक्षणे सुधारण्यास मदत करतात. क्वचितच, शस्त्रक्रिया करून लक्षणे कमी होऊ शकतात.

पार्किन्सन रोगाचे नाव इंग्लिश वैद्य जेम्स पार्किन्सन यांच्या नावावर ठेवले गेले आहे, ज्यांनी 1817 मध्ये शेकिंग पाल्सी किंवा पॅरालिसिस ऍजिटन्स नावाच्या आजाराचे सर्वसमावेशक वर्णन प्रकाशित केले होते.

Table of Contents

लक्षणे

थरथरणे किंवा अंग कापणे. हात किंवा बोटे झोपतांना देखील सतत हालचार सुरू असते. गाढ झोप लागली की सतत होणारी हातांची किंवी शरीराची हालचाल थांबते. अंगठा आणि तर्जनी पुढे-मागे घासून शेवया वळल्या सारखी सतत हालचाल होऊ शकते, याला पील रोलिंग मुवमेन्ट म्हणतात.

हालचाली मंदावल्या असल्याने साधी कामे देखील अवघड होतात. चालताना पावले जवळ जवळ पडतात. खुर्चीवर बसले असतांना त्यातून उठणे कठीण होते. चालतांना रुग्णाचे पाय जमिनीवर फरफटले जाऊ शकतात.

स्नायू कडक राहतात व ते वेदनादायक होऊ शकते. हालचालीची गतीची हळु होते.

मुद्रा आणि संतुलन बिघडलेले राहते. चालतांना पवित्रा वाकलेला असू शकतो, संतुलन सांभाळणे अवघड होते. 

आपोआप डोळे उघडबंद होणे, स्मीत हास्य करणे किंवा चालतांना आपोआप हात हलवणे यांसारख्या स्वयंचलित हालचाली कमी होतात.

रुग्ण पटकन बोलु शकत नाहीत, बोलतांना हळूवारपणे, नीरसपणे व पटापटा बोलतात, त्यांचे शब्द जीभ जडावल्यासारखे येतात. त्यांना लिहिणे कठीण होऊन बसते.

पार्किन्सन रोगाचे टप्पे

  • लक्षणे सौम्य, जीवनात व्यत्यय येत नाही.
  • दैनंदिन क्रियाकलाप कठीण, क्रियांना जास्त वेळ लागतो.
  • रुग्ण संतुलन गमावतो, हळू चालतो,  वारंवार पडतो. कपडे घालणे, खाणे आणि दात घासणे यांसारख्या दैनंदिन क्रियाकलाप अवघड होत जातात.
  • चालताना आणि दैनंदिन कामांसाठी रुग्णाला मदतीची आवश्यकता असते.
  • रुग्णाला चालता येत नाही, त्याला जगण्यासाठी पूर्णवेळ मदतीची आवश्यकता असते.

डॉक्टरांना कधी भेटायचे

तुमचे वय ६० पेक्षा जास्त असल्यास, तुम्हाला वरीलपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास, डॉक्टरांना जरूर भेटा.

पार्किन्सन रोगाची कारणे

मेंदूतील काही न्यूरॉन्स [मज्जातंतू पेशी] तुटतात किंवा मरतात. मेंदूमध्ये डोपामाइन नावाचा रासायनिक संदेशवाहक निर्माण करणाऱ्या न्यूरॉन्सच्या नुकसानीमुळे अनेक लक्षणे दिसून येतात. जेव्हा डोपामाइनची पातळी कमी होते, तेव्हा ते असामान्य मेंदूच्या क्रियाकलापांना कारणीभूत ठरते, ज्यामुळे हालचाली बिघडतात आणि पार्किन्सन रोगाची इतर लक्षणे दिसतात.

पार्किन्सन रोगाचे कारण अज्ञात आहे, परंतु अनेक घटक भूमिका बजावतात.

  • विशिष्ट अनुवांशिक उत्परिवर्तनांमुळे पार्किन्सन रोग होऊ शकतो.
  • काही विषारी पदार्थांच्या संपर्कात आल्याने पार्किन्सन रोगाचा धोका वाढू शकतो.
  • पार्किन्सन रोगाच्या कारणासाठी लेवी बॉडीजची उपस्थिती महत्त्वाचा संकेत देते.

जोखीम घटक

  1. वयानुसार जोखीम वाढते. बहुतेक लोक 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयात प्रभावित होतात.
  2. जवळच्या नातेवाईकांमध्ये पार्किन्सन्स रोग असला तर तुम्हाला हा आजार होण्याची शक्यता वाढते.
  3. लिंग: स्त्रियांपेक्षा पुरुषांना पार्किन्सन रोग होण्याची शक्यता जास्त असते.
  4. विषारी पदार्थांशी संपर्क.
  5. पार्किन्सन रोग (PD)-विरहित व्यक्तींशी तुलना केली असता, ज्यांना जप्ती-उत्तेजक परिस्थिती नसते, सहवर्ती न्यूरोलॉजिकल आजार असलेल्यांना अपस्माराच्या झटक्यांचा सर्वाधिक धोका असतो.

कॉम्प्लिकेशन्स

अनेक कॉम्प्लिकेशन्स होतात, पण त्यांचा उपचार करता येतो.

  • विचार करण्यात अडचणी, स्मृतिभ्रंश
  • नैराश्य आणि भावनिक बदल.
  • भीती, चिंता किंवा प्रेरणा कमी होणे.
  • चघळणे आणि खाणे अवघड होते, कुपोषण होते, गुदमरण्याची शक्यता असते.
  • गिळण्याची समस्या, लाळ गळणे.
  • झोपेची समस्या, दिवसा झोप येणे.
  • लघवीवर नियंत्रण ठेवण्यास असमर्थता, लघवी करण्यात अडचण.
  • मंद पचनसंस्थेमुळे मलावरोध.
  • ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन: रुग्ण उभे राहतात तेव्हा रक्तदाब अचानक कमी झाल्यामुळे चक्कर येणे किंवा डोके हलके होणे.
  • वासाची संवेदने कमी होते.
  • दुपारी अथवा सायंकाणी थकवा येतो.
  • कुठेही वेदना होतात.
  • लैंगिक इच्छा किंवा कार्यक्षमतेत घट.

प्रतिबंध

पार्किन्सन्सचे कारण अज्ञात असल्याने, हा रोग टाळण्याचे मार्ग देखील एक गूढच राहतात.

नियमित एरोबिक व्यायाम पार्किन्सन रोगाचा धोका कमी करू शकतो.

जे लोक कॉफी, चहा, ग्रीन टी आणि कोलामध्ये कॅफिनचे सेवन करतात त्यांना पार्किन्सन रोगाचा धोका कमी असतो.

निदान

पार्किन्सन रोगाचे निदान करण्यासाठी कोणतीही विशिष्ट चाचणी अस्तित्वात नाही. मेंदूचे विशेषज्ञ [न्यूरोलॉजिस्ट, न्यूरोसर्जन] रुग्णाच्या वैद्यकीय इतिहासावर, चिन्हे आणि लक्षणांचे पुनरावलोकन आणि न्यूरोलॉजिकल आणि शारीरिक तपासणीच्या आधारावर पार्किन्सन रोगाचे निदान करतात.

पार्किन्सन्स सारखीच लक्षणे असलेले इतर रोग नाहीत हे पहाण्यासाठी पॅथॉलॉजी प्रयोगशाळेच्या व इमेजींग चाचण्या केल्या जातात.

विशेष स्कॅन जसे की SPECT किंवा डोपामाइन ट्रान्सपोर्टर स्कॅन [DaTscan] चाचण्या मदत करू शकतात. एमआरआय, मेंदूचा अल्ट्रासाऊंड आणि पीईटी स्कॅन सारख्या इतर स्कॅनचा वापर इतर विकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो. पण पार्किन्सन रोगाचे निदान करण्यासाठी इमेजिंग चाचण्या विशेषतः उपयुक्त नाहीत.

चाचणी व्यतिरिक्त, पार्किन्सन रोगाची औषधे पुरेशा डोसमध्ये दिली जातात आणि जर रुग्णाला फायदा झाला तर पार्किन्सन्सच्या निदानाची पुष्टी केली जाऊ शकते.

कधीकधी पार्किन्सन रोगाचे निदान होण्यास वेळ लागतो. वेळोवेळी रुग्णाची स्थिती आणि लक्षणे यांचे मूल्यांकन करण्यासाठी आणि पार्किन्सन रोगाचे निदान करण्यासाठी डॉक्टर न्यूरोलॉजिस्टसह नियमित फॉलो-अप तपासणीचा सल्ला देऊ शकतात.

उपचार

पार्किन्सन रोग बरा होऊ शकत नाही, परंतु औषधे रोग्याच्या लक्षणांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकतात. अनेकदा काही अधिक प्रगत केसेस मध्ये शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.

जीवनशैलीतील बदल, विशेषतः एरोबिक व्यायाम करणे उपयोगी ठरते. फिझियोथेरपी की जी संतुलन आणि स्ट्रेचिंगवर लक्ष केंद्रित करते, काही केसमध्ये उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण ठरते. स्पीच आणि लँग्वेज थेरपिस्ट बोलण्याच्या समस्या सुधारण्यास मदत करू शकतात.

औषधे

चालणे, हालचाल आणि थरथरणाऱ्या समस्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी औषधे मदत करू शकतात. ही औषधे शरीरातील डोपामाइनचे प्रमाण वाढवतात किंवा ती जोपामाईनची पर्यायी औषधे आहेत.

पार्किन्सन रोग असलेल्या लोकांच्या मेंदूत डोपामाइनचे प्रमाण कमी असते. तथापि, डोपामाइन औषध म्हणून दिले जाऊ शकत नाही, कारण ते थेट मेंदूमध्ये प्रवेश करू शकत नाही. त्यामुळे मेंदूमध्ये प्रवेश करून डोपामाइन वाढवणारी किंवा डोपामाइनची पर्यायी औषधे दिली जातात.

पार्किन्सन रोगाचा उपचार सुरू केल्यानंतर लक्षणांमध्ये सुधारणा होते. तथापि, कालांतराने, औषधांचे फायदे हळूहळू कमी होतात किंवा कमी सुसंगत होतात. तरीही सहसा लक्षणे बऱ्यापैकी नियंत्रित होतात.

पार्किन्सन्सची काही औषधे

कार्बिडोपा-लेवोडोपा. लेव्होडोपा हे पार्किन्सन रोगावरील सर्वात प्रभावी औषध आहे. हे एक नैसर्गिक रसायन आहे जे मेंदूमध्ये जाते आणि त्याचे डोपामाइनमध्ये रूपांतर होते.

लेवोडोपा हे कार्बिडोपा (लोडोसिन) सह एकत्रित केले जाते, जे लेव्होडोपाला मेंदूच्या बाहेर डोपामाइनमध्ये लवकर रुपांतरित होण्यापासून संरक्षण करते. या मुळे मळमळी सारखे दुष्परिणाम कमी होतात.

साइड इफेक्ट्समध्ये मळमळ किंवा डोके हलके वाटणे (ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन) यांचा समावेश असू शकतो.

पार्किंसन रोग जसजसा वाढत जातो, तसतसे बर्‍याच वर्षांनी लेव्होडोपाचे फायदे कमी होऊ शकतात. कधी फायदे वाढतात, तर कधी ते कमी होतात.

लेव्होडोपाचे जास्त डोस घेतल्यानंतर अनैच्छिक हालचाली (डिस्कायनेसिया) होऊ शकतात. त्यामुळे हे दुष्परिणाम नियंत्रित करण्यासाठी डॉक्टर औषधांचा डोस कमी करतात.

इनहेल्ड कार्बिडोपा-लेवोडोपा (नाकातून श्वासाबरोबर घेतलेले औषध) देखील वापरले जाते. जेव्हा तोंडावाटे घेतलेले औषधे दिवसभरात अचानक काम करणे थांबवतात तेव्हा उद्भवणारी लक्षणे कमी करण्यासाठी श्वासाबरोबर घेतलेले औषध उपयुक्त ठरू शकते.

कार्बिडोपा-लेवोडोपा मिश्रण कार्बिडोपा आणि लेवोडोपापासून बनलेले आहे. तथापि, हे फीडिंग ट्यूबद्वारे दिले जाते. हे औषध थेट लहान आतड्यात जेलच्या स्वरूपात वितरीत केले जाते. हे अति प्रगत पार्किन्सन्स असलेल्या रूग्णांसाठी आहे जे अजूनही कार्बिडोपा-लेवोडोपाला प्रतिसाद देतात, परंतु त्यांच्या प्रतिसादात बरेच चढ-उतार आहेत. हे मिश्रण हळूहळू आणि सतत ओतले जात असल्याने, या दोन औषधांची रक्त पातळी बऱ्यापैकी स्थिर असते.

औषधे वितरीत करणार्‍या नळ्या एका छोट्या शस्त्रक्रियेद्वारे शरीरात ठेवल्या जातात. त्यातून सतत औषधे दिली जातात.  नलिका लावण्याच्या जोखमीं म्हणजे नलिका बाहेर निघू शकते किंवा त्या जागी संक्रमण होऊ शकते.

डोपामाइनऐवजी, डोपामाइन सारखीच औषधे वापरली जातात, ज्याला डोपामाइन ऍगोनिस्ट म्हणतात. लेव्होडोपा प्रमाणे डोपामाइन ऍगोनिस्टचे डोपामाइनमध्ये रूपांतर होत नाही. त्याऐवजी, ते मानवी मेंदूमध्ये डोपामाइन प्रभावांची नक्कल करतात. ते लक्षणांवर उपचार करण्यासाठी लेव्होडोपाइतके प्रभावी नाहीत. पण ही औषधे जास्त काळ टिकतात आणि लेव्होडोपामुळे काहीवेळा होणारे “चढ-उतार” कमी करायला वापरले जाऊ शकतो.

डोपामाइन ऍगोनिस्टमध्ये प्रॅमिपेक्सोल, रोपिनिरोल आणि रोटीगोटीन पॅच यांचा समावेश होतो. एपोमॉर्फीन हे एक कमी वेळ काम करणारे व इंजेक्शन द्वारे देण्याचे डोपामाइन ऍगोनिस्ट आहे. हे पटकन परिणाम करते.

डोपामाइन ऍगोनिस्ट्सचे काही दुष्परिणाम कार्बिडोपा-लेवोडोपाच्या दुष्परिणामांसारखेच आहेत. त्यामध्ये मतिभ्रम, निद्रानाश आणि अतिलैंगिकता, जुगार खेळणे आणि अति खाणे यासारख्या वर्तनांचा समावेश असू शकतो. त्यामुळे ही औषधे घेण्यार्या रूग्णांवर लक्ष ठेवायला लागते.

एमएओ बी इनहिबिटर जसे की सेलेजिलिन, रासागिलिन आणि सॅफिनामाइड यांचा समावेश होतो. ते ब्रेन एन्झाइम मोनोमाइन ऑक्सिडेस बी (एमएओ बी) प्रतिबंधित करून मेंदूच्या डोपामाइनचे विघटन रोखण्यास मदत करतात. हे एन्झाइम मेंदूच्या डोपामाइन कमी करते. लेव्होडोपा सोबत जर सेलेजिलीन दिले तर लेव्होडोपाचा परिणाम लगेच कमी होत नाही. 

MAO B इनहिबिटरच्या दुष्परिणामांमध्ये डोकेदुखी, मळमळ किंवा निद्रानाश यांचा समावेश असू शकतो. ही औषधे कार्बिडोपा-लेवोडोपा बरोबर दिल्यास भ्रम होण्याचा धोका वाढवतात.

Catechol O-methyltransferase (COMT) इनहिबिटर. उदाहरणे Entacapone आणि Opicapone आहेत. ते लेवोडोपा थेरपीचा प्रभाव सौम्यपणे वाढवतात. साइड इफेक्ट्स म्हणजे अनैच्छिक हालचाली (डिस्कायनेसिया), अतिसार, मळमळ किंवा उलट्या.

पार्किन्सन रोगाशी संबंधित थरथर नियंत्रित करण्यासाठी अँटीकोलिनर्जिक्स औषधे अनेक वर्षांपासून वापरली जात होती. बेंझट्रोपिन आणि ट्रायहेक्सिफेनिडिल ही उदाहरणे आहेत.

Amantadine चा उपयोग सौम्य, प्रारंभिक अवस्थेतील पार्किन्सन रोगाच्या लक्षणांपासून अल्पकालीन आरामासाठी केला जातो. अनैच्छिक हालचाली (डिस्कायनेसिया) नियंत्रित करण्यासाठी पार्किन्सन रोगाच्या नंतरच्या टप्प्यात कार्बिडोपा-लेवोडोपा थेरपी देखील दिली जाऊ शकते.

या लेखाच्या पुढील भागात पार्किन्सन रोगावरील शस्त्रक्रिया आणि रुग्णाच्या कुटुंबातील सदस्य किंवा मित्र यांनी सर्वांनी मिळून पार्किन्सन रोगाचा कसा सामना करावा याबद्दल माहिती देण्यात येईल.

Parkinson’s Disease – 1

पार्किन्सन/what is Parkinson's disease? - Samarth

Overview

Parkinson’s is a progressive nervous system disease that affects movement, expression, speed and so on. Symptoms start gradually and slowly increase. 

Although Parkinson’s disease can’t be cured, medications greatly help improve symptoms. Rarely, surgery may help reduce symptoms.

Parkinson’s disease is named after the English physician James Parkinson, who in 1817 published a comprehensive description of a disease called the Shaking Palsy or Paralysis Agitans

Table of Contents

Symptoms

  • Tremor or shaking begins in a limb, hand or fingers, even at rest. You may rub your thumb and forefinger back and forth, known as a pill-rolling tremor. 
  • Movements are slowed. This makes simple tasks difficult. Steps may become shorter while walking. Difficult in getting out of a chair. Patient’s feet may drag.
  • Rigid muscles, they can be painful. Range of motion is limited.
  • Impaired posture and balance. Posture may be stooped, may have balance problems.
  • Loss of automatic movements like blinking, smiling or swinging arms while walking.
  • Patients speak softly, monotonously, quickly, slur or hesitate before talking. 
  • It becomes hard to write.

Stages of Parkinson’s Disease

  • Symptoms are mild, do not interfere with life.
  • Daily activities are difficult and take more time.
  • The patient loses balance, moves slowly, and falls often. Daily activities like dressing, eating, and brushing teeth are impaired.
  • The patient needs assistance while walking and for daily activities.
  • The patient is unable to walk and needs full-time assistance for living.

When to see a doctor

If you are above 60, see your doctor if you have any of the above symptoms, see a doctor.

Causes of Parkinson’s Disease

Certain neurons [nerve cells] in the brain break down or die. Many of the symptoms are due to a loss of neurons that produce a chemical messenger in your brain called dopamine. When dopamine levels decrease, it causes abnormal brain activity, leading to impaired movement and other symptoms of Parkinson’s disease.

The cause of Parkinson’s disease is unknown, but several factors play a role.

  • Specific genetic mutations can cause Parkinson’s disease. 
  • Exposure to certain toxins may increase the risk of Parkinson’s disease.
  • The presence of Lewy bodies holds an important clue to the cause of Parkinson’s disease. 

Risk factors

  1. Risk increases with age. Most people are affected at 60 years or older.
  2. A close relative with Parkinson’s disease increases the chances that you’ll develop the disease.
  3. Sex: Men are more likely to develop Parkinson’s disease than women. 
  4. Exposure to toxins. 
  5. When compared to Parkinson’s disease(PD)-free individuals with no seizure-provoking conditions, those with concomitant neurological illnesses had the highest risk of epileptic seizures.

Complications

There are many complications, but they may be treatable:

  • Thinking difficulties, dementia
  • Depression and emotional changes.
  • Emotional changes: fear, anxiety, or loss of motivation. 
  • Chewing and eating problems, choking, and poor nutrition.
  • Swallowing problems, drooling.
  • Sleep problems, falling asleep during the day.
  • Inability to control urine, difficulty in urinating.
  • Constipation, is due to a slower digestive tract.
  • Orthostatic hypotension: feeling dizzy or lightheaded when patients stand up due to a sudden drop in blood pressure. 
  • Problems with your sense of smell.
  • Fatigue, especially later in the day. 
  • Pain in anywhere.
  • Decrease in sexual desire or performance.

Prevention

As the cause of Parkinson’s is unknown, ways to prevent the disease also remain a mystery.

Regular aerobic exercise might reduce the risk of Parkinson’s disease.

People who consume caffeine in coffee, tea, green tea, and cola have a reduced risk of Parkinson’s disease.

Diagnosis

No specific test exists to diagnose Parkinson’s disease. Brain specialists [neurologists, neurosurgeons] diagnose Parkinson’s disease based on the patient’s medical history, a review of signs and symptoms, and a neurological and physical examination.

Lab tests are done to rule out other conditions that have similar symptoms to Parkinson’s.

Special scans like SPECT or a dopamine transporter scan [DaTscan] tests can help. Other scans such as MRI, ultrasound of the brain, and PET scans may be used to help rule out other disorders. However, imaging tests aren’t particularly helpful for diagnosing Parkinson’s disease.

In addition to testing, Parkinson’s disease medications are given in a sufficient dose and if the patient benefits, the diagnosis of Parkinson’s can be confirmed. 

Sometimes it takes time to diagnose Parkinson’s disease. Doctors may recommend regular follow-up appointments with neurologists to evaluate the patient’s condition and symptoms over time and diagnose Parkinson’s disease.

Treatment

Parkinson’s disease can’t be cured, but medications can help control your symptoms, often dramatically. In some more advanced cases, surgery may be advised.

The doctor may also recommend lifestyle changes, especially aerobic exercise. In some cases, physical therapy that focuses on balance and stretching also is also useful and important. Speech and language therapists may help improve speech problems.

Medications

Medications may help you manage problems with walking, movement, and tremor. These medications increase or are a substitute for dopamine.

People with Parkinson’s disease have low brain dopamine concentrations. However, dopamine can’t be given directly as a medicine, as it can’t enter the brain. Hence medicines that enter the brain and increase dopamine or are dopamine replacements are given.

Significant improvements in symptoms occur after beginning Parkinson’s disease treatment. However, over time, the benefits of drugs gradually diminish or become less consistent. Yet usually symptoms are controlled fairly well.

Some of the Parkinson’s Medicines

Carbidopa-levodopa. Levodopa, the most effective Parkinson’s disease medication, is a natural https://popcake.com.ua chemical that passes into your brain and is converted to dopamine.

Levodopa is combined with carbidopa (Lodosyn), which protects levodopa from early conversion to dopamine outside your brain. This prevents or lessens side effects such as nausea.

Side effects may include nausea or light-headedness (orthostatic hypotension).

After many years, as the disease progresses, the benefit from levodopa may become less stable, with a tendency to wax and wane.

Involuntary movements (dyskinesia) may occur after taking higher doses of levodopa. Hence doctors lessen the dose of medicines to control these side effects.

Inhaled carbidopa-levodopa is also used. It may be helpful in managing symptoms that arise when oral medications suddenly stop working during the day.

Carbidopa-levodopa infusion is made up of carbidopa and levodopa. However, it’s administered through a feeding tube that delivers the medication in a gel form directly to the small intestine. It is for patients with advanced Parkinson’s who still respond to carbidopa-levodopa, but who have a lot of fluctuations in their response. As this combination is infused slowly and continually infused, blood levels of the two drugs are fairly steady.

The tubes delivering the drugs are placed via a small surgical procedure. Risks associated with having the tube include the tube falling out or infections at the infusion site.

Instead of Dopamine, drugs very similar to Dopamine, called Dopamine agonists are used. Unlike levodopa, dopamine agonists don’t change into dopamine. Instead, they mimic dopamine effects in the human brain. They aren’t as effective as levodopa in treating symptoms. However, they last longer and may be used with levodopa to smooth the sometimes “ups and downs” effect of levodopa.

Dopamine agonists include pramipexole, ropinirole and rotigotine patch. Apomorphine is a short-acting injectable dopamine agonist used for quick relief.

Some of the side effects of dopamine agonists are similar to the side effects of carbidopa-levodopa. They can include hallucinations, sleepiness and compulsive behaviours such as hypersexuality, gambling and eating. So patients on these medications must be observed if they are behaving out of character for you, and the treating doctor must be informed.

MAO B inhibitors like include selegiline, rasagiline, and safinamide are useful. They help prevent the breakdown of brain dopamine by inhibiting the brain enzyme monoamine oxidase B (MAO B). This enzyme metabolizes brain dopamine. Selegiline given along with levodopa may help prevent wearing-off of levodopa.

Side effects of MAO B inhibitors may include headaches, nausea or insomnia. When added to carbidopa-levodopa, these medications increase the risk of hallucinations.

Catechol O-methyltransferase (COMT) inhibitors. Examples are Entacapone and Opicapone. They mildly prolong the effect of levodopa therapy. Side effects are an increased risk of involuntary movements (dyskinesia), diarrhoea, nausea or vomiting.

Anticholinergics medications were used for many years to help control the tremor associated with Parkinson’s disease. Examples are benztropine and trihexyphenidyl. 

Amantadine is used for short-term relief of symptoms of mild, early-stage Parkinson’s disease. It may also be given with carbidopa-levodopa therapy during the later stages of Parkinson’s disease to control involuntary movements (dyskinesia).

We will discuss surgical treatment for Parkinson’s disease and how to cope with Parkinson’s disease as a patient and as a family member or friend.